Dharashiv Water Shortage Saam tv
महाराष्ट्र

Dharashiv Water Shortage : धाराशिव जिल्ह्यातील प्रकल्पात फेब्रुवारीतच पाणीसाठा ५० टक्क्यांवर; टंचाईची शक्यता

Dharashiv News : उन्हाळ्यात जाणवणारी भीषण पाणी टंचाई यंदा जाणवणार नसल्याचे वाटत होते. मात्र फेब्रुवारी महिन्यातच पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात देखील हीच परिस्थिती निर्माण झाली

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: यंदा राज्यातील सर्वच भागात चांगला पाऊस झाला आहे. यामुळे पाण्याची समस्या जवळपास मिटल्याचे चित्र होते. त्यानुसार धाराशिव जिल्ह्यात देखील समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील एकुण २२६ लघु व मध्यम प्रकल्प तुडुंब भरले होते. मात्र जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या मध्यातच येथी पाणीसाठा ५० टक्क्यांवर आला आहे. यामुळे आगामी काळात जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता वार्तिविली जात आहे. 

राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये यंदाच्या पावसाळ्यात मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे सर्वच नद्या, नाल्यांना पूर आला होता. यामुळे पाण्याची समस्या मिटली होती. मागील वर्षी उन्हाळ्यात जाणवणारी भीषण पाणी टंचाई यंदा जाणवणार नसल्याचे वाटत होते. मात्र अनेक ठिकाणी फेब्रुवारी महिन्यातच पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. तर धाराशिव जिल्ह्यात देखील हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. 

पाणीसाठा ५० टक्क्यांवर 

धाराशिव जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील  २२६ लघु व मध्यम प्रकल्प तुडुंब भरले होते. मात्र पाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार फेब्रुवारी महीन्यातच या प्रकल्पातील पाणीसाठा निम्मावर म्हणजेच ५० टक्क्यांवर येवुन ठेपला आहे. सध्याची हि परिस्थिती पाहता आगामी तीन महिन्यात पाणी टंचाईला सामोरे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

चोरटा पाणी उपसा 

धाराशिव जिल्ह्यातील प्रकल्पातुन चोरटा पाणी उपसा होत असल्याने पाणी साठा कमी होत असुन त्यामुळे आगामी दिवसात होणारी पाणी टंचाईची शक्यता लक्षात घेवुन उपलब्ध पाणीसाठा संरक्षित करावा. तसेच पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे. यामुळे जिल्ह्यात उद्भवणारी पाणी टंचाई रोखता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT