Dharashiv News:  Saamtv
महाराष्ट्र

Dharashiv News: संतापजनक! गतिमंद विद्यार्थ्याला शिक्षकाकडून मारहाण; शाळा प्रशासनविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक

Kalamb Latest News: हा संपूर्ण प्रकार गंभीर असल्याचे सांगत या शिक्षकावर कारवाईचे आश्वासन शाळा प्रशासनाने दिले आहे.

Gangappa Pujari

बालाजी सुरवसे, प्रतिनिधी...

Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. मतिमंद विद्यार्थ्याला शाळेतील शिक्षकांकडूनच मारहाण करण्यात आली आहे. लीनेश कांबळे असे हा मारहाण करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून संभाजी ब्रिगेडने याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गतिमंद विद्यार्थ्याला शाळेतील शिक्षकांकडून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार कळंब (Kalamb) शहरात घडला आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात हा शिक्षक या विद्यार्थ्यांना घेऊन बाजारपेठेत आला होता. यावेळी हा प्रकार घडला.

ही मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटिव्ही (CCTV) कॅमेरात कैद झाली असून हा शिक्षक शहरातील सोजर मतिमंद शाळेत नौकरीला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, प्रत्यक्षदर्शिंनी शिक्षकास जाब विचारला असता शिक्षकाने उपस्थितांना उर्मट भाषेत उत्तरे दिली.

हे प्रकरण समोर आल्यानंतर संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade)आक्रमक पवित्रा घेतला असून संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शाळा प्रशासनास चांगलेच धारेवर धरण्यात आले. दरम्यान, हा संपूर्ण प्रकार गंभीर असल्याचे सांगत या शिक्षकावर कारवाईचे आश्वासन शाळा प्रशासनाने दिले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

बनावट CBI चा मुंबई पोलिसांकडून भांडाफोड; सराफा व्यावसायिकांना लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Pune Accident : पुणे-नाशिक महामार्गावर ३ वाहनांचा भीषण अपघात; कारचा चक्काचूर अन्...

Panner Chilli Recipe: घरच्या घरी बनवा स्ट्रीट फूडस्टाईल टेस्टी पनीर चिली, वाचा सोपी रेसिपी

Rain Alert : राज्यावर अल निनोचं संकट! कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; रायगड, पुणे घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT