Tuljabhavani Temple Dress code Saam Tv
महाराष्ट्र

Tuljabhavani Temple : सिद्धीविनायक मंदिरानंतर तुळजाभवानीच्या मंदिरातही लागू होणार ड्रेस कोड? मंदिर संस्थानकडे होतेय मागणी

Tuljabhavani Temple Dress code : तुळजाभवानीच्या मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. यापूर्वीही मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला होता. पण काही कारणांमुळे तो निर्णय रद्द झाला.

Yash Shirke

बालाजी सुरवसे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Tuljabhavani Temple : मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरामध्ये ड्रेसकोड लागू करण्यात आला. यामुळे शॉर्ट, फाटके कपडे घालून येणाऱ्यांना दर्शनाला बंदी केली जाणार असल्याचे मंदिराच्या ट्रस्टने स्पष्ट केले आहे. या निर्णयाला बहुतांश लोकांचा पाठिंबा मिळाला आहे. तर काहींना यावर आक्षेप घेतला आहे. आता धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात देखील ड्रेस कोड लागू करण्यात यावा अशी मागणी मंदिर संस्थांच्या अध्यक्षांकडे होत आहे.

महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ड्रेस कोड लागू करावा असे निवेदनद्वारे मागणी करण्यात आली आहे. महाकालेश्वर, घृष्णेश्वर, काशी विश्वेश्वर, तिरुपती बालाजी, पद्मनाभन स्वामी आणि आता सिद्धीविनायक मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड लागू आहे. शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय, एसटी यांप्रमाणे तुळजाभवानी मंदिरातही वस्त्र संहिता असावी असे महासंघाने म्हटले आहे.

मंदिरामध्ये देवीच्या दर्शनासाठी तोकड्या कपड्यांमध्ये किंवा परंपराहीन वेशभूषेत जाणे हे व्यक्ती स्वातंत्र्य असू शकत नाही. मंदिराचे पावित्र्य टिकवण्यासाठी भाविकांना वस्त्र संहिता लागू करावी. महाराष्ट्रातील ५५० मंदिरांमध्ये भाविकांना वस्त्र संहिता (ड्रेस कोड) लागू केली आहे. तुळजाभवानी मंदिरातही त्याचे आचरण करावे अशी मागणी मागणी जिल्हाधिकारी आणि मंदिर संस्थानाचे अध्यक्ष यांच्याकडे करण्यात आली आहे.

'तुळजाभवानी मंदिरात यापूर्वी ड्रेस कोड लागू करण्यात आला होता. पण काही कारणांमुळे तो निर्णय मागे घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन सादर केले आहे. मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी, रुढीपरंपरेचे जतन करण्यासाठी ड्रेस कोड लागू करण्यात यावा. तोकडे कपडे घालून येणाऱ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये', असे पाळीकर पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack Recovery: हार्ट अटॅकनंतर कोणता व्यायाम सुरक्षित? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला...

Today Horoscope : आज 'या' ३ राशींना होणार फायदाच फायदा; जाणून घ्या तुमच्या राशीत काय आहे खास?

RCB vs GT IPL 2026 Final: विजयी षटकार मारत आरसीबीने दुसऱ्यांदा जिंकली आयपीएलची ट्रॉफी

Krunal Pandya: कृणाल पांड्याचा जादूवाला चेंडू पाहून बटलर चक्रावला; क्रिकेटचा देव मात्र भारावला! कृणालचं सचिन तेंडुलकरकडून कौतुक

RCB vs GT Final: आरसीबीने सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद; विजयासह रचला इतिहास

SCROLL FOR NEXT