Dharashiv News Saam tv
महाराष्ट्र

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

Dharashiv News : गावातील प्रतिष्ठित नागरीकांवर बलात्काराचे खोटे गुन्हे दाखल करणे, गावात भांडण तंटे करणे. यासह इतर कारणामुळे समाजाला कोणत्याही मुलभूत सुविधा देण्यात येवु नये; असा ठराव

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
कळंब (धाराशिव)
: धाराशिवच्या कळंब तालुक्यातील पानगाव ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव करत आदिवासी समाजावर सामाजिक बहिष्कार टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. मे महिन्यात झालेल्या ग्रामसभेत ठराव करण्यात आला होता. दरम्यान या ठराव विरोधात सामाजिक कार्यकर्ते बजरंग ताटे यांनी आंदोलनाचा इशारा दिला असून ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी केली आहे. 

धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील पानगाव ग्रामपंचायतीने २९ मे रोजी ग्रामसभा घेतली होती. या ग्रामसभेत गावाजवळ राहणाऱ्या आदिवासी समाजाकडुन गावातील प्रतिष्ठित नागरीकांवर बलात्काराचे खोटे गुन्हे दाखल करणे, गावात भांडण तंटे करणे. यासह इतर कारणामुळे समाजाला कोणत्याही मुलभूत सुविधा देण्यात येवु नये; असा ठराव घेत सामाजिक बहिष्कार घातला. अशा पद्धतीने बहिष्कार टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे.  

ठराव घेणाऱ्यांवर कारवाईची मागणी 

मात्र आदिवासी समाजाच्या विरोधात घेण्यात आलेल्या ठरावावरुन सामाजिक कार्यकर्ते बजरंग ताटे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. आदिवासी समाजाला मुलभूत सुविधा देण्यात याव्यात व बेकायदेशीर ठराव घेणाऱ्या सबंधितावर कारवाई करावी. यासाठी कळंबच्या उपविभागीय अधिकारी व पंचायत समिती कार्यालयात सत्याग्रह आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. 

सरपंच अपात्रतेची प्रस्ताव 

या प्रकरणी प्रशासनाने गावाला भेट देवुन सदरील बेकायदेशीर ठराव रद्द केला असुन असा ठराव घेतल्याप्रकरणी सरपंचावर अपात्रेची कारवाई करण्याबाबत वरीष्ठांकडे प्रस्ताव पाठविल्याचे गटविकास अधिकारी विनोद जाधव यांनी दिली. मात्र ग्रामपंचायतीकडुन आम्हाला कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. रेशन कार्ड, आधार कार्ड नाही, कोणत्याही मुलभूत सुविधा मिळत नसल्याने शासनाने आमच्याकडे लक्ष देण्याची मागणी आदीवासी समाजातील महिलांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: निदा खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Work From Home: वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू होणार? PM मोदींच्या आवाहनानंतर चर्चांना उधाण

Agricultural Subsidy Scheme: शेतकऱ्यांनो! सब्सिडीवर मिळेल ट्रॅक्टर,रोटाव्हेटर आणि ड्रोन; कसा कराल अर्ज?

Shocking : धक्कादायक! आईला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, संतापलेल्या मुलानं उचललं भयंकर पाऊल

एकनाथ शिंदेंना मोठा हादरा बसणार; बडा नेता नाराज, लवकरच पक्षाची साथ सोडणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT