Dharashiv News Saam tv
महाराष्ट्र

Dharashiv News : शरद पवार गटाचा धाराशिव जिल्ह्यातील ३ जागांवर दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील भुम- परांडा- वाशी, तुळजापूर आणि कळंब - धाराशिव या जागांवर शरद पवार गटाकडून दावा करण्यात आला आहे.

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल आहे. यामुळे आता सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. शिवाय जागांवर दावे केले जात आहेत. अशातच धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून चार पैकी तीन जागांवर दावेदारी केली आहे. या दावेदारीमुळे महाविकास आघाडीमध्ये चांगलीच रस्सीखेच होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

धाराशिव (Dharashiv News) जिल्ह्यातील भुम- परांडा- वाशी, तुळजापूर आणि कळंब - धाराशिव या जागांवर शरद पवार गटाकडून दावा करण्यात आला आहे. यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यांनी शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार कैलास पाटील यांच्या मतदार संघात इच्छुक आहेत. जिल्ह्यातील इच्छुकांनी शरद पवारांची भेट घेत आपली मागणी मांडली. (NCP) राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी त्याबाबतची माहिती दिली. 

काँग्रेसकडूनही दावेदारी 

जिल्ह्यातील १६ इच्छुकांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या आहेत. सर्वाधिक सात इच्छुक तुळजापूर मतदार संघात आहेत. काँग्रेसकडूनही त्या जागेवर दावेदारी केली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटपाचा तोडगा कसा निघणार हे पहावं लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT