Dharashiv News Saam tv
महाराष्ट्र

Dharashiv News : पंधरा दिवसांपासून शाळेला कुलूपच; विद्यार्थ्यांच्या हाती दिला दाखला, शाळेसमोर पालकांचा ठिय्या

Dharashiv news : राज्यात ऐकीकडे १५ जूनपासून शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शाळेचा परिसर विद्यार्थ्यांनी गजबजून गेला आहे.

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : शैक्षणिक वर्ष सुरु होऊन पंधरा दिवसांच्यावर कालावधी झाला आहे. मात्र धाराशिवच्या बोरगाव खुर्द येथील शाळेंचे कुलूपच उघडण्यात आलेले नाही. अर्थात मागील पंधरा दिवसापासून शाळा कुलूपबंद असून या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा दुसरीकडे स्थलांतरित केली जात असल्याने हा सर्व प्रकार सुरु आहे. 

राज्यात ऐकीकडे १५ जूनपासून शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शाळेचा परिसर विद्यार्थ्यांनी गजबजून गेला आहे. मात्र (Dharashiv) धाराशिवच्या कळंब तालुक्यातील बोरगाव खुर्द येथील राजीव गांधी विद्यालय ही इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतची शाळा आहे. मात्र अद्यापही शाळा कुलुपबंद आहे, ही शाळा (School) लातुरला स्थलांतरित करण्याच्या शाळा प्रशासनाच्या हालचाली चालु असुन त्यामुळे शाळा प्रशासनाने विद्यार्थी व पालकांच्या हातात टि.सी देवुन रिकामे झाले आहेत. 

या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असुन तब्बल ३७ वर्षापासून सुरू असलेली ही शाळा स्थलांतरित करण्यात येत असल्याने विद्यार्थी व पालकांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. विद्यार्थी व पालकांनी शाळेच्या आवारासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले असून आमची शाळा सुरू करा; अशी मागणी या विद्यार्थीनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matar 5 Dishes : हिवाळ्यात आवर्जून बनवा मटारच्या या ५ डिशेस

Mumbai Travel : नवीन वर्षात ट्रेकिंगसाठी खास लोकेशन, मुंबईपासून जवळ आहे 'हे' ऐतिहासिक ठिकाण

Dusky Skin Makeup Tips: सावळ्या रंगाच्या त्वचेवर अशा पद्धतीने करा मेकअप; चेहऱ्यावर दिसेल नॅचरल ग्लो

Ladki Bahin : "आम्हालाच मत द्या, नाहीतर 'लाडकी बहीण'चे ₹१५०० बंद करू, भाजप नेत्यांकडून ब्लॅकमेल"

Maharashtra Live News Update: अमरावती शहरात मतदारसंख्येत मोठी वाढ

SCROLL FOR NEXT