RTE Admission Saam tv
महाराष्ट्र

RTE Admission : आरटीईची प्रवेश प्रक्रिया रखडली; धाराशिवमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन

Dharashiv News : राज्य सरकारने खाजगी शाळांमध्ये आरटीई प्रवेश प्रक्रिया अंतर्गत २५ टक्के राखीव जागा संदर्भात घेतलेल्या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मात्र राज्य सरकार अद्यापपर्यंत हा आदेश मागे घेत नाही.

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : आरटीई अंतर्गत खाजगी शाळांमधील प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या मुद्द्यावरून धाराशिवमध्ये शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शालेय शिक्षणमंत्री दिपक केसकर यांचे पोस्टर उलटे टांगत आंदोलन करण्यात आले.  

राज्य सरकारने खाजगी शाळांमध्ये आरटीई प्रवेश प्रक्रिया अंतर्गत २५ टक्के राखीव जागा संदर्भात घेतलेल्या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मात्र राज्य सरकार अद्यापपर्यंत हा आदेश मागे घेत नाही. त्यामुळे २५ टक्के राखीव जागेवरील प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. शाळा सुरु होऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटला असून अजूनपर्यंत या अंतर्गत प्रवेश मिळत नसल्याने याचा विद्यार्थ्यांना फटका बसत आहे.  

राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी 

या निर्णयाच्या विरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. तसेच शालेय शिक्षणमंत्री दिपक केसकरांचे पोस्टर उलटे टांगत ठाकरे गटाने आंदोलन केले. यावेळी राज्य सरकार व शिक्षण मंञी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT