Dharashiv Medical Collage Saam tv
महाराष्ट्र

Dharashiv Medical Collage : वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना नोटीसा; कार्यालयीन वेळेत राहतात गायब

Dharashiv News : कार्यालयीन कामकाजासह रुग्णांची गैरसोय झाली होती. या कारणाने डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : वैद्यकीय महाविद्यालयातील कार्यालयीन वेळेत गायब असलेल्या डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर कारवाईचा (Dharashiv News) बडगा उगारण्यात आला आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील अशा ३ डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. याचा खुलासा लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (Medical College) कामानिमित्त वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. शिल्पा डोमकूंडवार (Doctor) आणि प्रशासकीय अधिकारी उदयकुमार पाद्य हे २२ मार्च रोजी बाहेरगावी होते. याची माहिती मिळताच काही डॉक्टरांसह कर्मचारी दिवसभर गायब झाले होते. यामुळे कार्यालयीन कामकाजासह रुग्णांची गैरसोय झाली होती. या कारणाने डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तर प्रशासकीय कारवाई 

मनमानी रोखण्यासाठी वैद्यकीय अधिष्ठाता व प्रशासकीय अधिकारी मुंबई येथून आल्यावर महाविद्यालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात येणार आहे. यामुळे डॉक्टरांसह काही कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सदर कारणे दाखवा नोटीस संदर्भात तसेच खुलासा समाधानकारक नसेल तर त्यांच्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई केली जाणार असल्याचे नोटीस मध्ये म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

shivsena : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? आज फैसला, कोर्टातून आली मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवारांवरील टीकेवरून संजय काकडेंचे शरद पवार व राहुल गांधींना पत्र

Today's Horoscope : तुमचा आजचा दिवस कसा जाणार? ३ राशींवर होणार पैशांचा पाऊस?

Egg Benefits : पिवळा की पांढरा? अंडे खाताना कोणता भाग खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरेल

Wednesday Horoscope: आजच्या दिवसातील हे संकेत दुर्लक्षित करू नका, वाचा तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT