Saam Impact News Saam tv
महाराष्ट्र

Saam Impact News : पोषण आहारातील मिलेट न्यूट्रेटिव्ह बारचा पुरवठा थांबविला; चॉकलेटमध्ये निघाल्या होत्या अळ्या, पुरवठादाराला नोटीस

Dharashiv News : विद्यार्थ्यांना पोषण तत्व असलेले चॉकलेट वाटपापूर्वी ते तपासले असता त्यात अळ्या आढळल्या. हा प्रकाराबाबत साम टीव्हीने बातमी प्रसारित केली होती. बातमीची दखल प्रशासनाकडून घेण्यात आली

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचे अनेकदा समोर आले आहे. तर मुलांना दिल्या जाणाऱ्या पौष्टिक चॉकलेट मध्ये अळ्या आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिवमध्ये समोर आला होता. या प्रकरणी साम टीव्हीने बातमी दिल्यानंतर पोषण आहारातील मिळत न्यूट्रॅटिव्ह बार थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पुरवठादाराला नोटीस बजावण्यात आली आहे.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ज्वारी, बाजरी पासुन तयार केलेले मिलेट न्यूट्रेटिव्ह बार चॉकलेट दिले जातात. धाराशिव तालुक्यातील पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पौष्टिक चॉकलेटमध्ये दोन दिवसांपूर्वी अळ्या आढळून आल्याचा प्रकार समोर आला. विद्यार्थ्यांना पोषण तत्व असलेले चॉकलेट वाटपापूर्वी ते तपासले असता त्यात अळ्या आढळल्या. हा प्रकाराबाबत साम टीव्हीने बातमी प्रसारित केली होती. या बातमीची प्रशासनाकडून दाखल घेण्यात आली आहे.

पुरवठादाराला बजावली नोटीस 

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा व धाराशिव तालुक्यात दोन दिवसात पाच शाळेमध्ये अळ्या निघाल्याचा प्रकार घडला आहे. अर्थात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचे समोर आले आहे. याबाबत धाराशिव जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून मिलेट न्यूट्रेटिव्ह बार चॉकलेट पुरवणाऱ्या पुरवठादाराला नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच या लॉटचा पुरवठा तात्काळ थांबवण्याचे आदेश देखील दिले आहेत. 

शाळांनाही दिले पत्र 
जिल्हा परिषद शिक्षण विभाग अलर्ट झाला असून पुरवठादाराला नोटीस देण्यासोबतच जिल्ह्यातील सर्व शाळांना सदरील चॉकलेट विद्यार्थ्यांना वाटप न करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. तसेच पुरवठा दार एजन्सीवर देखील कारवाई करण्यात यावी; यासंबंधी राज्याच्या शिक्षण सचिवांना देखील जिल्हा परिषदेमार्फत पत्र पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT