Maratha Reservation Saam tv
महाराष्ट्र

Maratha Reservation : विद्यार्थ्यांनी टाकला परिक्षांवर बहिष्कार, ९ ग्रामपंचायत सदस्यांचा राजीनामा; मराठा आंदोलक आक्रमक

Dharashiv News : विद्यार्थ्यांनी टाकला परिक्षांवर बहिष्कार, ९ ग्रामपंचायत सदस्यांचा राजीनामा; मराठा आंदोलक आक्रमक

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे
धाराशिव
: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून आंदोलन अधिक तीव्र केले जात आहे. (Dharashiv News) काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण आले आहे. कळंब (Kalamb) तालुक्यात इटकूर गावातील ९ ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामा दिला आहे. तर विद्यार्थ्यांनी परीक्षांवर बहिष्कार टाकला आहे. (Live Marathi News)

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरु आहेत. याच दरम्यान धाराशिव जिल्ह्यात मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला असुन कळंब तालुक्यातील ईटकुर व परीसरातील गावातील तब्बल १५ मराठा बांधवांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केल आहे. तर गावातील ९ ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. तर गावातील शालेय विद्यार्थ्यांनी शालेय परिक्षांवर बहिष्कार टाकला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तोपर्यंत अन्नत्याग 

धाराशिव जिल्ह्यात देखील आता आंदोलन उभारण्यात आले आहे. जोपर्यंत (Maratha Aarkshan) मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही. तोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आम्ही अन्नत्याग करत आमरण उपोषण सुरू ठेवणार; असा निर्धार समाज बांधवांनी केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanam Kapoor Story: गडगंज पगाराच्या नोकरीला रामराम, १२० स्क्वेअरफूटमध्ये सुरुवात, आता हजारो कोटींचा मालक, सक्सेस स्टोरी वाचाच

Sharad Pawar News: शरद पवारांचे अजित पवारांबाबत मोठे वक्तव्य; काकांकडून पुतण्याच्या कौतुकाचं गूढ काय?

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत भाजपकडून ४० जणांची हकालपट्टी, बंडखोरांना दाखवला घरचा रस्ता!

Matru Vandana Yojana: गर्भवती महिलांना मिळतात ६००० रुपये; केंद्राची मातृत्व वंदना योजना नक्की आहे तरी काय?

Viral Video: प्रवाशांची हातापायी आता थांबणार, प्रवाशाने ट्रेनमध्ये बसण्यासाठी शोधला अजबच जुगाड; पाहा व्हायरल VIDEO

SCROLL FOR NEXT