बालाजी सुरवसे
धाराशिव : दुध दरवाढीसह धाराशिव जिल्हा संपुर्ण दुष्काळ जाहीर करावा. सन २०२०-२१ मधील प्रलंबित (Dharashiv News) पिकविमा तात्काळ देण्यात यावा; यासह अन्य मागण्यांसाठी (NCP) राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला. कळंब येथे रास्ता रोको करत रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करण्यात आले. (Latest Marathi News)
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्यावतीने केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी दुधाला योग्य दर (Milk Price) मिळावा, शेतीला पुर्ण क्षमतेने वापर विज पुरवठा करण्यात यावा, संपूर्ण धाराशिव जिल्हा दुष्काळी जाहीर करावा; यासारख्या मागण्या करण्यात आल्या. या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट चांगलाच आक्रमक झाला असुन कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करत रस्त्यावर दुध ओतुन सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सरकार विरोधात घोषणाबाजी
दरम्यान मुख्य चौकात हा रास्ता रोको केल्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार जोरदार घोषणाबाजी केली. शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर पुर्ण कराव्यात अन्यथा यापेक्षा तिव्र आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.