Vashi Bajar samiti Saam tv
महाराष्ट्र

Vashi Bajar samiti : वाशी बाजार समितीत २४ लाखांचा अपहार; माजी सभापती प्रशांत चेडे यांच्यासह तत्कालीन संचालकांवर गुन्हा दाखल

Dharashiv News : बाजार समितीत १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१५ या कालावधीत वाशी बाजार समितीत संचालक मंडळाची कसलीही मंजुरी न घेता २४ लाख ७० हजार रुपये नियमबाह्य पद्धतीने अदा केले

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : धाराशिवच्या वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत २४ लाख रुपयांचा अपहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी तत्कालीन सभापती प्रशांत चेडे यांच्यासह सर्व तत्कालीन संचालकांवर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

धाराशिव (Dharashiv News) जिल्ह्यातील वाशी बाजार समिती मोठी आहे. दरम्यान या बाजार समितीत १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१५ या कालावधीत वाशी बाजार समितीत (Bajar Samiti) संचालक मंडळाची कसलीही मंजुरी न घेता २४ लाख ७० हजार रुपये नियमबाह्य पद्धतीने अदा केले होते. याच अनुषंगाने लेखापरीक्षक केशव बोंदर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाशी पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपहार प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. 

दरम्यान वाशी बाजार समितीत प्रशांत चेडे हे २०१३ ते २०१५ दरम्यान सभापती होते. याच काळात हा अपहार झाल्याचे समोर आले आहे. तर तत्कालीन सभापती प्रशांत चेडे हे सध्या परंडा विधानसभा मतदार संघातून विधानसभेची तयारी करीत आहेत. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर बाजार समितीतील अपहार झाल्याचा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shilpa Shinde: 'अंगूरी भाभी' जेलमध्ये जाणार? प्रोड्यूसरवर हरेसमेंटचे खोटे आरोप भोवले, अभिनेत्रीच्या अटकेची मागणी

Pune Hospital: पुण्यातील आरोग्य विभाग 'व्हेंटिलेटर'वर, पालिका रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचा तुटवडा; धक्कादायक आकडेवारी समोर

एक नंबरचे स्वार्थी आणि ढोंगी असतात 'ही' माणसं! आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 'या' २ सवयींवरून ओळखा

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाचे दमदार आगमन

Mumbai Crime : मुंबईत भयंकर घडलं! आईच्या बॉयफ्रेंडचं टाळकं सटकलं, अमानुष मारहाणीत ४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT