Maratha Aarkshan Saam tv
महाराष्ट्र

Maratha Aarkshan : धाराशिवमध्ये चक्काजाम; मराठा आंदोलक आक्रमक, शहर बंदची हाक

Dharashiv News : मराठा आरक्षणासाठी माजोन जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरु केले आहे. त्यानुसार मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करुन जरांगे पाटील यांचे उपोषण थांबवण्याची समाज बांधवांची मागणी केली आहे.

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: मराठा आरक्षणाच्या मागणीवरून धाराशिवमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. सांजा येथील (dharashiv News) ग्रामस्थ बैलगाड्या दुचाकीसह छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाले असून चौकात चक्काजाम आंदोलनाला सुरवात केली आहे. तसेच धाराशिव शहर बेमुदत (Maratha Aarkshan) बंदची मराठा समाज बांधवाकडुन हाक देण्यात आली आहे. (Maharashtra News)


मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरु केले आहे. त्यानुसार मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करुन जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे उपोषण थांबवण्याची समाज बांधवांची मागणी केली आहे. धाराशिवमध्ये मराठा समाज आक्रमक झाला असुन धाराशिवच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तर आंदोलकांनी बेमुदत धाराशिव (Maratha Reservation) शहर बंदची हाक दिली असुन सांजा येथील ग्रामस्थ बैलगाड्यांसह दुचाकी ताफा घेवुन शिवाजी महाराज चौकात दाखल झाले आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दुकाने केली बंद 

मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावी व मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण थांबवण्यासाठी सरकारने तात्काळ पुढाकार घ्यावा; या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. शिवाजी महाराज चौकात अचानक सुरू केलेल्या चक्काजाम आंदोलनामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. तर चौक परीसरातील दुकाने देखील बंद करण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

SCROLL FOR NEXT