Dharashiv Crime Saam tv
महाराष्ट्र

Dharashiv Crime : दुचाकीवरून येत महिलेचे मंगळसुत्र लांबवीले; धाराशिवमधील घटना, चोरटा सिसिटिव्ही कॅमेऱ्यात कैद

Dharashiv News : धाराशिवमधील साधना धाबेकर ही महीला लग्नासाठी स्कुटीवरुन जात होती. गांधीनगर भागातून जात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील २० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसुत्र चोरट्याने तोडून पोबारा

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : धाराशिव शहरातील गांधीनगर भागात एका महीलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीचा प्रकार समोर आला आहे. चोरीची घटना सिसिटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चालत्या गाडीवरुन मंगळसूत्र चोरून चोरटा पसार झाला आहे. अशा अनेक घटना घडत असल्याने या भागात दहशत निर्माण झाली आहे. 

धाराशिवमधील (Dharashiv News) साधना धाबेकर ही महीला लग्नासाठी स्कुटीवरुन जात होती. गांधीनगर भागातून जात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील २० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसुत्र चोरट्याने तोडून पोबारा केला  अचानक घडलेल्या या प्रकाराने महिला घाबरून गेली. तिने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिक जमा झाले होते. मात्र तोपर्यंत दुचाकीवरील चोरटे पसार झाले होते. यानंतर सदर महिलेले पोलिसात याबाबत तक्रार नोंदविली होती. 

दरम्यान महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र चोरुन नेल्याचा हा सगळा प्रकार (CCTV) सिसिटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असुन दिवसा ढवळ्या या घटना होत असल्याने नागरीकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वाढत्या घटनांकडे (Police) पोलिसांचे माञ साफ दुर्लक्ष होत असल्याच्या प्रतिक्रिया परिसरातून समोर आल्या. त्यामूळे पोलीस या चोरट्यांच्या मुसक्या कधी आवळणार असा प्रश्‍न  नागरीकांतुन उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shampoo Tips: शॅम्पू करताना चुकूनही करू नका 'या' ७ चुका; केस होतील खराब, डॉक्टरांनी सांगितली योग्य पद्धत

Maharashtra News Live Update: MPSCने पुन्हा परीक्षा ढकलली; २५ ऑक्टोबरची गट-क पूर्व परीक्षा आता ३ जानेवारीला

Akash Dalvi : राजकीय वातावरण तापलं! भाजपच्या नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा दाखल

Walking After Dinner Benefits: जेवणानंतर १५ मिनिटे चालण्याची सवय लावा; शरीराला मिळतील 'हे' ७ आरोग्यदायी फायदे

Sleeping Issues : रात्रभर झोपूनही दिवसा झोप येते? 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, वेळीच व्हा सावध!

SCROLL FOR NEXT