Tuljabhavani Temple Saam tv
महाराष्ट्र

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याला पुरातन झळाळी; मंचकी निद्रेतून तुळजाभवानी सिंहासनावर विराजमान

Dharashiv News : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिराची पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली मुंबईतील सवानी कन्स्ट्रक्शनने काम केले विकास आराखड्यातील एकूण तिन टप्यात काम

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे
धाराशिव
: तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा संपून आज शाकंभरी महोत्सवाला सुरुवात झाली आहे. दरम्यान देवीच्या मंचकी निद्रेच्या काळात देवीच्या मुख्य गाभाऱ्याला पुरातन झळाळी देण्यात आली आहे. गाभाऱ्यातील भिंतीवर लावण्यात आलेले ग्रॅनाईट काढत मूळ दगडांना ब्रशिंग व सेंड ब्लास्टिंग करत गाभाऱ्याला पुरातन लुक देण्यात आला आहे. यामुळे भाविकांना आता मंदिराच्या गाभाऱ्यात पुरातन लूक पाहता येणार आहे. 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिराची पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली मुंबईतील सवानी कन्स्ट्रक्शनने हे काम केले आहे. विकास आराखड्यातील एकूण तिन टप्यात होणाऱ्या कामाचा पहिला टप्पा सुरु करण्यात आला आहे. यासाठी ५८ कोटी १२ लाख रुपयाच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तुळजाभवानी मंदिरातील होम कुंड, पालखी कट्टा आणि स्टेडीयमचे काम पहिल्या टप्यात पुर्ण केले जाणार आहे.

गाभाऱ्याचे काम पूर्ण 

तुळजाभवानी देवीच्या मंदिराचे जतन व संवर्धन करण्याच्या अनुषंगाने पुरातत्व विभागाकडून हे काम सुरु करण्यात आले आहे. तीन टप्प्यात काम करण्यात येणार असून तुळजाभवानी देवी आठ मंचकी निद्रा अवस्थेत होती. या आठ दिवसांच्या कालावधीत मंदिरातील गाभाऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यामुळे आता गाभाऱ्यात पुरातन लूक पाहण्यास मिळत आहे. 

तुळजाभवानी देवी आज सिंहासनावर विराजमान
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीची आठ दिवसाची मंचकी निद्रा संपून आज देवी सिंहासनावर पुन्हा विराजमान झाली आहे. देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात होत असून १४ तारखेपर्यंत हा शाकंभरी नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. दरम्यान देवीची मुर्ती ही चल मुर्ती आहे. त्यामुळे देवीचे सिंहासन व संपुर्ण गाभारा गोमुख तिर्थाने धुवुन घेण्यात आला. त्यानंतर पहाटे विधिवत पुजा करून तुळजाभवानीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. शाकंभरी नवरात्रोत्सव म्हणजे देवीचा छोटा दसरा असतो त्यासाठी आज दुपारी घटस्थापना करत विधिवत पूजा केली जाते. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Schedule: कधी लवकर तर कधी उशिरा झोपता? हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो परिणाम; जाणून घ्या 'या' ७ टिप्स

Shocking : धक्कादायक! ९ महिन्याचं बाळ धावत्या एक्सप्रेसच्या खिडकीतून पडले, नंतर जे घडलं त्याने काळजाचा ठोका चुकला

"मेंटेनन्स देणार नाही, काय करायचं ते करा" असं म्हणणाऱ्या फ्लॅटधारकांना झटका; सोसायटी करू शकते 'ही' कडक कायदेशीर कारवाई

Shivali Parab: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचा साडीतील रॉयल लूक; पेस्टल गुलाबी-लाल साडीत दिसतेय अप्सरा

Maharashtra News Live Update: वाळूच्या डंपरची दुचाकीला जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT