Police investigation underway after a tragic suicide case linked to a relationship dispute in Dharashiv district. saam tv
महाराष्ट्र

Dharashiv Crime: डान्सरसोबत अनैतिक संबंध! बायकोचा फोन आला अन् राडा झाला, तरुणानं घेतला टोकाचा निर्णय

Sai Kala kendra Dancer : धाराशिवमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. एका २५ वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडलयी. प्रेयसीशी वाद झाल्यानंतर विवाहित पुरूषाने आत्महत्या केली आहे.

Bharat Jadhav

बालाजी सुरवसे, साम प्रतिनिधी

काही दिवसापूर्वी जामखेडमधील कला केंद्रातील एका नर्तकीनं अनैतिक प्रेम संबंधात आत्महत्या केल्याची घटना घडली होती. आता पु्न्हा तशीच घटना घडलीय. कला केंद्रमधील नर्तकीच्या प्रेमात असलेल्या एका तरुणाने आत्महत्या केलीय. ही घटना धाराशिवमध्ये घडलीय. याघटनेने धाराशिव जिल्ह्यात खळबळ उडालीय.

अश्रुबा अंकुश कांबळे वय वर्ष 25 असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. धाराशिवमधील साई कला केंद्रमध्ये नृत्य काम करणाऱ्या महिलेशी अश्रुबा कांबळे याचे प्रमे संबंध होते. अश्रुबा हा विवाहित होता. दरम्यान प्रेयसी आणि त्याच्यात वाद झाल्यानंतर त्याने गळफास घेत आत्महत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

मृत आश्रुबा कांबळे हा रुई ढोकी या गावचा आहे रहिवाशी होता. गेल्या पाच वर्षापासून यांच्यात अनैतिक प्रेमसंबंध होते. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण आणि तरुणी शनि शिंगणापूर येथे काल देवदर्शनाला गेले होते. देवदर्शन करून परतत असताना झाला वाद होता. परतीचा प्रवास करत असताना अश्रुबाला त्याच्या बायकोचा फोन आला त्यानंतर नृतकी प्रेयसी आणि अश्रुबा यांच्यात वाद झाला.

प्रेयसी रुसल्यानंतर त्याने आपण आत्महत्या करून घेऊ अशी धमकी दिली. मात्र त्यावेळी त्याच्या प्रेयसीनं त्याच्या धमकीकडे दुर्लक्ष केल. दरम्यान याप्रकरणी येरमाळा पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आलीय. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर पोस्टमार्टम करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपी महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस तिची चौकशी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT