theft case in mp omraje nimbalkar farm near dharashiv  Saam Digital
महाराष्ट्र

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

Omraje Nimbalkar Join Shinde Group : धाराशिवचे ठाकरेसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकरांच्या भूमिकेमुळे शिंदेसेनेचं ऑपरेशन टायगर फसल्याची चर्चा सुरू होती. मात्र, या चर्चांवर आता पडदा पडलाय. ओमराजेंनी शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय घेतला असून ऑपरेशन टायगर यशस्वी होण्याचा मार्ग मोकळा झालाय का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

धाराशिवचे ठाकरेसेनेचे बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं. धाराशीवमध्ये रविवारी गोवर्धनवाडीतल्या बैठकीत त्यांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर ओमराजे निंबाळकरांचा शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय पक्का झाल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे ओमराजेंची समजूत काढणाऱ्या ठाकरेसेनेला मोठा धक्का बसलाय. एक-दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचं सांगत ओमराजेंनी शिंदेसेनेतील संभाव्य प्रवेशाबाबत आणखी सस्पेन्स वाढवला होता. मात्र, आता खुद्द ओमराजेंनी आपण शिंदेसेनेत जाणार असल्याचं जाहीर केलंय. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही ऑपरेशन टायगरबाबत सूचक वक्तव्य केलंय.

खरंतर, खासदार ओमराजे निंबाळकरांच्या मनधरणीचे प्रयत्न ठाकरेसेनेकडून करण्यात आले होते. ऑपरेशन टायगर फेल करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी रात्रीत एक मोठी चाल खेळली होती. इतकंच नव्हे तर ओमराजेंची समजूत काढण्यासाठी ठाकरेंनी धाराशीवचे आमदार कैलास पाटील आणि मुंबईतील आमदार वरुण सरदेसाई यांना पाठवलं होतं. या दोन्ही नेत्यांनी ओमराजेंची भेटदेखील घेतली होती.

खरंतर, खासदार ओमराजे निंबाळकरांच्या मनधरणीचे प्रयत्न ठाकरेसेनेकडून करण्यात आले होते. ऑपरेशन टायगर फेल करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी रात्रीत एक मोठी चाल खेळली होती. इतकंच नव्हे तर ओमराजेंची समजूत काढण्यासाठी ठाकरेंनी धाराशीवचे आमदार कैलास पाटील आणि मुंबईतील आमदार वरुण सरदेसाई यांना पाठवलं होतं. या दोन्ही नेत्यांनी ओमराजेंची भेटदेखील घेतली होती.

खरंतर, पवनराजे हत्याप्रकरणाचा निकाल लागल्यापासून उद्धव ठाकरे हे खासदार ओमराजे निंबाळकरांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. तसेच ओमराजे मातोश्रीवर येऊन उद्धव यांची भेट घेणार असल्याचीही चर्चा होती. दुसरीकडे ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊतांनीही ओमराजेंसोबत चर्चा करण्याची तयारी दर्शवत बंडखोर खासदारांबाबत मोठा दावादेखील केला होता. मात्र, आता ओमराजेंनी अखेर आपला निर्णय जाहीर करत शिंदेसेनेतील पक्षप्रवेशासंदर्भातील चर्चांवर अखेर पडदा टाकलाय. यामुळे उर्वरीत पाच खासदारांची धाकधुकही थांबली आहे. कारण ऑपरेशन टायगर यशस्वी होण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा कुरकुरीत 'भेंडीची भजी'

Commonwealth Games 2026 : भारताच्या लेकींचा गोल्डन पंच; बॉक्सिंगमध्ये प्रीती पवार, जॅस्मिननं जिंकली सुवर्णपदके

Inflation Alert: सणासुदीपूर्वी सर्वसामान्यांना झटका! डिटर्जंटपासून पेंटपर्यंत 'या' वस्तू होणार महाग

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अंतर्गत वाद; बड्या नेत्याच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी, पक्षात काय घडतयं?

पावसाळ्यात तुम्ही कधी कुरकुरीत 'कंटोळी फ्राय' खाल्ली आहे का? एकदा नक्की ट्राय करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT