महाराष्ट्र

Dharashiv Maratha Andolan : तानाजी सावंत मराठा आंदोलकांच्या भेटीला, राजीनाम्याच्या मागणीने आंदोलनस्थळी गोंधळ, नेमकं काय घडलं?

Political News : तानाजी सावंत उपोषणस्थळी आल्यानंतर मराठा समाजाच्या तरुणांची जोरदार घोषणाबाजी सुरु केली.

साम टिव्ही ब्युरो

बालाजी सुरवसे

Dharashiv News :

मनोज जरांगे पाटील  यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अक्षय नाईकवाडी या तरूणासह काहींनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. उपोषणकर्त्यांची आज आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी भेट घेतली.

तानाजी सावंत उपोषणस्थळी आल्यानंतर मराठा समाजाच्या तरुणांची जोरदार घोषणाबाजी सुरु केली.  मराठा आरक्षणाचा ठोस निर्णय न झाल्यास राजीनामा देणार का? असा सवाल काहींनी सावंत यांना विचारला.

त्यामुळे काहीसा गोंधळ त्याठिकाणी निर्माण झाला. सावंतानी राजीनामा देण्याची मागणी करत घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलक अमोल जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

यावर बोलताना तानाजी सावंत यांनी म्हटलं की, मी नेहमीच मराठा समाजासोबत राहिलो आहे. मराठा आरक्षण मिळेत नाही तोवर जीवात जीव असेपर्यंत तुमच्यासोबत राहणार आणि तुमच्यासोबत वेळ पडली तर रस्त्यावर उतरेन. (Latest Marathi News)

मनोज जरांगे पाटील यांनी औषध-पाणी घेण्यास नकार

गेल्या 14 दिवसापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला सुरवात केली आहे. सरकारकडून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे म्हणून वंशावळीच्या आधारे आधादेशही काढण्यात आला.

मात्र यानंतर जरांगे पाटील यांनी सरकारला चार दिवसाचा अल्टीमेटम दिला होता. हा चार दिवसाचा अल्टीमेटम संपल्यानंतर जरागे यांनी काल सकाळपासून पाणी आणि औषध उपचार घेण्यासही नकार दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Haunted Fort : रहस्यमय घटना अन् भयानक आवाज, 'या' किल्ल्यावर दिवसा देखील जाण्यास घाबरतात लोक

Heart blockage: 70% ते 90% हार्ट ब्लॉकेज किती धोकादायक? जाणून घ्या खरा फरक

Road accident: महामार्गावर रात्री भीषण अपघात! उभ्या लॉरीवर कार आदळून ८ इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

Dahi Handi 2026: गोविंदा पथकांसाठी खास! दहीहंडी फोडण्याआधी खा 5 हेल्दी पदार्थ; दिवसभर टिकून राहील शरीरातली ऊर्जा

Maharashtra News Live Update: विठ्ठल मंदिरात गोकुळाष्टमी साजरी

SCROLL FOR NEXT