Dharashiv Latest News:  Saamtv
महाराष्ट्र

Dharashiv News: ब्रेकिंग! तानाजी सावंत यांच्या पुतण्याच्या बंगल्यासमोर गोळीबार; महायुतीच्या सभेआधी धक्कादायक प्रकार

Dharashiv Latest News: दोन अज्ञात इसमांनी दुचाकीवर येऊन गोळीबार केल्याचा दावा धनंजय सावंत यांच्या सुरक्षारक्षका कडून करण्यात आला आहे. या घटनेने धाराशिव जिल्ह्यासह राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Gangappa Pujari

बालाजी सुरवसे, धाराशिव|ता. १३ सप्टेंबर

Dharashiv Firing News: धाराशिवमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या परंडा तालुक्यातील सोनारी येथील घरासमोर गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काल मध्यरात्री 12 वाजून 37 मिनिटांनी दोन अज्ञात इसमांनी दुचाकीवर येऊन गोळीबार केल्याचा दावा धनंजय सावंत यांच्या सुरक्षारक्षका कडून करण्यात आला आहे. या घटनेने धाराशिव जिल्ह्यासह राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धाराशिव जिल्ह परंडा तालुक्यातील सोनारीमधील बंगल्यासमोर हा गोळीबाराचा थरार घडला. या गोळीबाराच्या घटनेने राजकी. वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

गुरुवारी (ता. १२ सप्टेंबर) मध्यरात्री १२ वाजून ३७ मिनिटांनी दोन अज्ञात इसमांनी दुचाकीवर येऊन गोळीबार केल्याचा दावा धनंजय सावंत यांच्या सुरक्षा रक्षकांकडून करण्यात आला आहे. याबाबत तक्रार देण्यासाठी सावंत यांचे सुरक्षारक्षक आंबी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. गोळीबार कोणी केला हे अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस त्याचा योग्य तपास करतील अशी अपेक्षा धनंजय सावंत यांनी व्यक्त केली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेते हे उद्या 14 सप्टेंबर रोजी परंडा येथे येणार आहेत, मात्र या दौऱ्याच्या आदल्या दिवशी गोळीबाराची घटना घडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: पुन्हा ईकेवायसी सुरू होणार? एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहि‍णींना दिला शब्द, वाचा नेमकं काय म्हणाले?

राज्य मंत्रिमंडळात मोठा फेरबदल; नवीन मंत्र्यांना खातेवाटप मिळताच राजकारण तापलं

DC vs RR: दिल्लीच्या विजयानं प्लेऑफमधील चुरस वाढली; स्टार्क आणि राहुल ठरले विजयाचे शिल्पकार

Maharashtra News Live Update: परभणीत उन्हाचा कहर, तापमानाने गाठला 45.2 अंशांचा उच्चांक

Junnar ST Bus Accident: गुंजाळवाडीजवळ शेगाव-कल्याण एसटीचा भीषण अपघात; दोन ते तीनवेळा उलटली बस, दोघांचा मृत्यू, १७ जखमी

SCROLL FOR NEXT