Lavanga Elaichi NecklaceTo Tulja Bhavani Devi Saam Tv
महाराष्ट्र

Dharashiv Breaking: मोठी बातमी! चॉकलेटनंतर तुळजाभवानी देवीला विलायची अन् लवंगाचा हार; भाविकांमध्ये संताप, कारण काय?

Lavanga Elaichi Necklace To Tulja Bhavani Devi: धाराशिवमधून तुळजाभवानी देवीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आलीय. देवीला लवंगा आणि विलायचीचा हार न घातल्याने भाविक संतापले आहेत.

Rohini Gudaghe

बालाजी सुरवसे, साम टीव्ही धाराशिव

धाराशिवमध्ये मागील काही दिवसांपू्र्वी तुळजाभवानी देवीला चॉकलेटचा हार घातल्याची घटना घडली होती. त्यानंतर काही भाविकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर आता तुळजाभवानी देवीला भाविकांनी आणलेला विलायची अन् लवंगाचा हार घातला नाही, त्यामुळे भाविक संतापले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एक नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

नेमकं प्रकरण काय?

तुळजाभवानी देवीला भाविकांने आणलेला विलायची आणि लवंगाचा हार न घातल्याने भाविक आणि भोपे पुजारी मंडळातुन मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली (Dharashiv Breaking) जातेय. तुळजाभवानी मंदीर प्रशासनाने चुकीच्या लोकांच्या म्हणण्यानुसार भक्तांवर अन्याय करु नये, अशी प्रतिक्रिया तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी दिलीय.

मंदीर प्रशासनाकडून अन्याय होत असल्याचा आरोप

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीला चॉकलेटचा हार घातल्याने काही पुजाऱ्यांनी आक्षेप घेतला (Lavanga Elaichi Necklace To Tulja Bhavani Devi) होता. दरम्यान मंदीर प्रशासन चुकीच्या लोकांच्या मागणीला ग्राह्य धरुन भक्तांवर अन्याय करत आहे. भाविकांनी मोठ्या श्रध्देने देवीला वाहण्यासाठी जे काही आणलेले असते, ते देवीला चढवण्यासाठी मोठ्या श्रद्धेने आणलेले (Tulja Bhavani Devi Contravesry) असते. त्यामुळे चुकीच्या लोकांच्या मागणीला ग्राह्य धरुन मंदीर प्रशासन किती दिवस अन्याय करणार? कारण भक्तांनी आणलेल्या साड्या सुध्दा देवीला चढवल्या जात नसल्याचं अमरराजे कदम यांनी म्हटलंय.

भाविकांमध्ये नाराजीचा सूर

अनादी कालापासून चालत आलेला कौल मागण्याचा विधी बंद केलाय. भक्तांनी आणलेला हार कशाचाही (Tuljapur News) असो, त्यामागील भक्तांची श्रध्दा प्रशासनाने लक्षात घ्यावी. मुळात देव हा भाविकांसाठी असतो. त्यामुळे मंदीर प्रशासनाने याची नोंद घ्यावी. चुकीच्या लोकांनी केलेल्या चुकीच्या मागण्या नाकाराव्यात, अशी मागणी तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

SCROLL FOR NEXT