Dharashiv Mauli Giri dies during treatment Saam Tv News
महाराष्ट्र

प्रेम प्रकरणातून बेदम मारहाण, १४ दिवस मृत्यूशी झुंज, माऊलीचा करुण अंत; आई-वडिलांचा मन हेलावणारा आक्रोश

Dharashiv Mauli Giri Dies During Treatment : धाराशिव जिल्ह्यात प्रेम प्रकरणातून मारहाण झालेल्या १८ वर्षीय तरुणाची अखेर मृत्यूशी झुंज संपली आहे. या तरुणाला प्रेम प्रकरणातून बेदम मारहाण झाली होती.

Prashant Patil

सोलापूर : धाराशिव जिल्ह्यात प्रेम प्रकरणातून मारहाण झालेल्या १८ वर्षीय तरुणाची अखेर मृत्यूशी झुंज संपली आहे. या तरुणाला प्रेम प्रकरणातून बेदम मारहाण झाली होती. या तरुणाचं नाव माऊली गिरी असं असून त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात या तरुणावर १४ दिवस उपचार सुरु होते.

माऊलीला प्रेम प्रकरणातून बेदम मारहाण झाली होती. मारहाणीनंतर तो शुद्धीवरच नसल्याचं त्याच्या आई-वडिलांनी सांगितलं. संबंधित सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी माऊलीच्या आई-वडिलांनी केली आहे. या सर्व प्रकरणाची धाराशिव जिल्ह्यातील आंबे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. या तरुणाला सोलापुरातील खासगी हॉस्पिटल मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी गर्दी केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

धाराशिव जिल्ह्यातील भूम इथे १८ वर्षीय तरुणाला लोखंडी रॉड, काठीने अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली होती. मारहाणीनंतर तरुणाला मृत समजून भूम तालुक्यातील पांढरेवाडी शिवारात विवस्त्र अवस्थेत फेकून देण्यात आलं होतं. सात ते आठ जणांच्या टोळक्याकडून मारहाण करण्यात आली होती. पाठीपासून तळपायापर्यंत बेदम मारहाण करण्यात आली होती. गुप्तांगालाही तीक्ष्ण वस्तूने इजा केल्याची माहिती देण्यात आली आहे. तरुण मृत झाल्याचं समजून रस्त्यालगत विवस्त्र अवस्थेत फेकून दिलं होतं.

मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाची मृत्यूशी झुंज आज संपली. मुख्य आरोपी सतीश जगतापसह सात जणांविरोधात अंबी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. तर इतर आरोपी फरार आहेत. प्रेम प्रकरणातून ही मारहाण झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जनतेच्या विश्वासाला न्याय देण्याचा प्रयत्न - सुनेत्रा पवार

8 व्या वेतन आयोगाआधी सरकारचं कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, होळीच्या आधी गुड न्यूज

ICC T20 WC: सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला सुपर८चे किती सामने जिंकावे लागतील? समजून घ्या संपूर्ण गणित

Sindhudurg Tourism : रुपेरी वाळू सोनेरी लाटा...; कोकणात 'येथे' घ्या रोमांचक जलक्रीडांचा अनुभव

राज्यात राजकीय घडामोडींना वेग; मुख्यमंत्र्यांनी तातडीने बोलावली मंत्रिमंडळाची बैठक, VIDEO

SCROLL FOR NEXT