dhananjay munde, pankaja munde saam tv
महाराष्ट्र

Vaidyanath Sugar Factory Election: वैद्यनाथ साखर कारखाना निवडणुकीत धनंजय मुंडेंचा मोठा निर्णय, बहिण-भावातील संघर्ष टाळण्याचा प्रयत्न?

Dhananjay Munde And Pankaja Munde : साखर कारखाना निवडणुकीसाठी धनंजय मुंडे यांनी अर्ज भरलेला नाही.

Priya More

Beed News: बीडच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Vaidyanath Cooperative Sugar Factory Election) मुंडे बहिण-भावांनी संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र दिसून येत आहे. 21 संचालकांच्या निवडीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 50 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे साखर कारखाना निवडणुकीसाठी धनंजय मुंडे यांनी अर्ज भरलेला नाही.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या पाठोपाठ त्यांच्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे, अॅड. यशश्री मुंडे आणि त्यांच्या मातोश्री प्रज्ञा गोपीनाथराव मुंडे यांनी सुद्धा वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी मात्र आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या 21 जागेच्या निवडणुकीसाठी 16 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 50 जणांनी आपले नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक कार्यालय परळी यांच्या कार्यालयात दाखल केले आहेत. यामध्ये आमदार धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक वाल्मीक कराड, अजय मुंडे आणि इतरांनी अर्ज दाखल केले.

धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. तर पंकजा मुंडे यांनी स्वतःसह आई आणि दोन्ही बहिणींचे देखील अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान यामुळे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशीच याचे चित्र स्पष्ट होणार आहे. पण धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न केल्यामुळे मुंडे बहिण-भावातील संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

Ketan Agarwal Case: चार चुका अन् केतनच्या हत्येचा उलगडा; नोकर ठरणार साक्षीदार, सिया-चेतनला फाशी होणार?

SCROLL FOR NEXT