Sharad Pawar News Saamtv
महाराष्ट्र

Sharad Pawar News: गहुंजे स्टेडियमला शरद पवारांचे नाव द्या... 'या' बड्या नेत्याचे रोहित पवारांना पत्र

सध्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून MPL 2023 अर्थात महाराष्ट्र प्रीमिअर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

विनोद जिरे

Maharashtra Premier League News: पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानास शरद पवार यांचे नाव देण्याची मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी केली आहे. याबद्दलचे पत्र त्यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांच्याकडे पाठवले आहे.

या पत्रात आयपीएलच्या धर्तीवर एमपीएल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व आमदार रोहित पवार यांचे अभिनंदनही केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून MPL 2023 अर्थात महाराष्ट्र प्रीमिअर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला 15 जूनपासून सुरुवात झाली. या स्पर्धेतील अंतिम सामना हा 29 जूनला पार पडणार आहे. अशा एकूण 15 दिवस ही स्पर्धेचा थरार रंगणार आहे.

या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि माजी सामाजिक न्यायमंत्री आणि आमदार धनंजय मुंडे उपस्थित होते. ज्यानंतर धनंजय मुंडे यांनी या स्टेडियमला शरद पवार यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. (Latest Marathi News)

काय आहे पत्रात....

या मागणी संदर्भात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी एक पत्र लिहले आहे. ज्यामध्ये त्यांनी पद्मविभूषण आदरणीय शरद पवार (Sharad Pawar) साहेबांचे क्रिकेट विश्वात मोठे योगदान आहे. साहेबांच्या या योगदानाचा सन्मान म्हणून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (गहुंजे) आंतरराष्ट्रीय मैदानास आदरणीय साहेबांचे नाव देण्यात यावे अशी मागणी एमसीएचे अध्यक्ष आमचे बंधू आ. रोहित पवार दादांकडे केली असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, एमपीएल स्पर्धेत धनंजय मुंडे यांच्या मालकीचा छत्रपती संभाजी किंग्स हा मराठवाड्याचा संघ सहभागी झाला आहे. या संघाच्या सामन्यांच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी ही मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT