dhananjay Munde  Saam tv
महाराष्ट्र

Karuna Munde News : धनंजय मुंडेंना मोठा धक्का; करुणा मुंडेंची पोटगी कायम, कोणता पुरावा गेमचेंजर ठरला? VIDEO

Karuna Munde latest News : माझगाव कोर्टाने धनंजय मुंडेंना मोठा दणका दिलाय... त्यामुळे करुणा मुंडेंची पोटगी कायम राहण्याचा मार्ग मोकळा झालाय.. मात्र हे प्रकरण नेमकं काय आहे? कोर्टात कोणता पुरावा गेमचेंजर ठरला? पाहूयात या विशेष रिपोर्टमधून....

Bharat Mohalkar

करुणा मुंडेंनी कोर्टात धनंजय मुंडेंचं इच्छापत्र सादर केलंय. या इच्छापत्रात करुणा मुंडेंचा पहिली पत्नी असा उल्लेख करण्यात आलाय.. हाच पुरावा कोर्टात गेमचेंजर ठरला आणि माझगाव कोर्टाने धनंजय मुंडेंची याचिका फेटाळून लावलीय...हा धनंजय मुंडेंसाठी मोठा धक्का मानला जातोय.. तर वांद्रे कोर्टाने दिलेला करुणा मुंडेंना 2 लाख रुपये पोटगीचा निर्णय कायम ठेवलाय...त्याबद्दल करुणा मुंडेंनी समाधान व्यक्त केलंय...

धनंजय मुंडेंनी वांद्रे कोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिल्यानंतर करुणा मुंडेंनी माझगाव कोर्टात लग्नाचे पुरावे सादर केले.. मात्र हे पुरावे खोटे असल्याचा युक्तीवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केला... मात्र त्यानंतर करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंचं इच्छापत्र आणि स्वीकृतीपत्र सादर केलं... यामध्ये नेमकं काय म्हटलंय? पाहूयात...

मुंडेंचं इच्छापत्र करुणा मुंडेंकडून सादर

धनंजय मुंडेंच्या इच्छापत्रात करुणा मुंडे पहिल्या तर राजश्री मुंडे दुसऱ्या पत्नी असा उल्लेख

करुणा मुंडेंचा मुलगा सिशीव माझ्या प्रेताला अग्नी देईल, असा उल्लेख

9 जानेवारी 1998

करुणा मुंडेंसोबत वैदिक विवाह केल्याचा स्वीकृतीपत्रात दावा

आई-वडिलांच्या दबावातून दुसरं लग्न केल्याचाही उल्लेख

मात्र करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये कोर्टातील लढाईत काय घडलं? पाहूयात...

कोर्टाचा धनंजय मुंडेंना दणका

2022

करुणा मुंडेंकडून वांद्रे कौटुंबिक न्यायालयात घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल

याचिकेत दरमहा 15 लाख पोटगी देण्याची मागणी

5 फेब्रुवारी 2025

वांद्रे कोर्टाकडून धनंजय मुंडेंना 2 लाख पोटगी देण्याचे आदेश

6 फेब्रुवारी 2025

धनंजय मुंडेंकडून वांद्रे कोर्टाच्या निर्णयाला आव्हान

29 मार्च 2025

करुणा मुंडेंकडून पहिली पत्नी असल्याचे पुरावे सादर

5 एप्रिल 2025

माझगाव कोर्टाने धनंजय मुंडेंची याचिका फेटाळली

माझगाव कोर्टाने याचिका फेटाळल्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आधीच संतोष देशमुख प्रकरणात मुंडेंचं मंत्रिपद गेलं.. आता कौटुंबिक हिसाचार प्रकरणात दोषी ठरल्याने मुंडेंची आमदारकीही जाणार का? याच्याच चर्चा रंगल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: RSS च्या शताब्दी वर्षाचा समारोप रेशीमबाग मैदानावर विजयादशमी आणि शस्त्रपूजन उत्सवाने होणार

जगभरात Gen Z आंदोलनांचा भडका, सत्ताधाऱ्यांंविरोधात नागरिक रस्त्यावर

Gokul Election 2026: सतेज पाटलांनी विरोधकांना दाखवलं आस्मान; वाचा विजयी उमेदवरांची यादी

Skin Care : नाकावर ब्लॅकहेड्स वाढले आहेत? जाणून घ्या घरच्या घरी करता येणारे ७ सोपे उपाय

Tuesday Horoscope : दसऱ्याचा दिवस शुभ ठरणार, मोठे अडथळे दूर अन् काहींना होणार धनलाभ; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT