Dhananjay Munde Saam tv
महाराष्ट्र

Dhananjay Munde : शांत बसलो असं समजू नका; धनंजय मुंडे संतापले, इशारा कुणाला?

Dhananjay Munde Latest News : मंत्री धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया, सुरेश धस यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं आहे.

Vishal Gangurde

बीड : संतोष देशमुख प्रकरणावरून राजकारण तापलं आहे. बीडमधील संतोष देशमुख प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांनाही सातत्याने लक्ष्य केलं जात आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, भाजप आमदार सुरेश धस यांनीही मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाराचे गंभीर आरोप केले आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपांना मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शांत बसलो असं समजू नका, असं म्हणत मंत्री धनंजय मुंडे यांनी गर्भित इशारा दिला आहे.

मंत्री धनंजय मुंडे पत्रकार परिषदेत म्हणाले, 'आज ५८ वा दिवस आहे. माझ्या विरोधात मीडिया ट्रायल सुरु आहे. का आणि कशामुळे चालू आहे, हे मला माहीत नाही. डीबीटीबाबत आरोप करण्यात आले. डीबीटीचे संपूर्ण अधिकार मी कृषीमंत्री असताना आणि मुख्यमंत्री यांच्या तरतुदीनुसार झाले. याच कार्यपद्धतीचा अवलंब केलेला आहे. मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांनी ही प्रक्रिया अंतिम केलेली आहे'.

'अंजलीताई शेतकरी आहेत का, माहीत नाही. खरा शेतकऱ्याला माहीत असतं की, पेरणीआधी मशागत करावी लागते. लोकसभेची आचारसंहिता, जून महिन्यात होणारा खरीप हंगाम लक्षात घेऊन निवडणुकीची आचारसंहिता लादण्यापूर्वी खरेदी प्रक्रिया मार्च महिन्यात राबवण्यात आली, असे मुंडे म्हणाले.

'पेरणीआधी काय करावं लागतं, शेतकऱ्याला पेरणीनंतर फवारणी कधी करावी लागते, हे अंजलीताईंना माहीत नाही. त्यांनी नॅनो खतांचा आरोप केला, असे मुंडे म्हणाले. धांदात खोटे बोलणे, आरोपातून सनसनाटी निर्माण करणे असं सुरु आहे. त्यांच्या आरोपांमध्ये पहिल्यासारखी विश्वासार्हता राहिली नाही. त्यांनी फवारणीच्या किंमतीवर भाष्य केलं. इतर सर्व राज्यांपेक्षा कमी किंमतीत म्हणजे २८५७ रुपयांना पडला आहे, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

'आम्ही शांत बसलो असं समजू नका, आम्हालाही बोलता येतं, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी दमानिया यांना इशारा दिला. धनंजय मुंडे यांच्या प्रत्युत्तरानंतर अंजली दमानिया काय प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT