Inauguration of distribution of 51 tonnes of fodder by Devpushp Foundation for drought affected farmers saam tv
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपाच्या नेत्याकडून ५१ टन चारा वाटप, सोलापुरात आदर्श उपक्रम

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा नेते राहुल काटकर यांच्या ‘देवपुष्प फाउंडेशन’तर्फे तब्बल ५१ टन चारा वाटपाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

विश्वभूषण लिमये

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या पशुधनाला चाऱ्याचा आधार मिळावा आणि संकटाच्या काळात बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहता यावे, या सामाजिक भावनेतून भाजपा युवा नेते राहुल काटकर यांच्या ‘देवपुष्प फाउंडेशन, महाराष्ट्र’च्या वतीने ५१ टन (५१, हजार किलो) चारा वाटपाच्या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा शानदार शुभारंभ करण्यात आला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या ५१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला असून, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ झाला.

पशुधन वाचवण्याची काळाची गरज

दुष्काळात पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही अत्यंत गंभीर बनतो. कुटुंबातील सदस्याप्रमाणे जपलेल्या पशुधनाच्या चाऱ्याची व्यवस्था करताना शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक आणि मानसिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा बिकट परिस्थितीत पशुधन जगविण्यासाठी मदतीचा हात पुढे करणे ही काळाची गरज आहे, याच जाणीवेतून देवपुष्प फाउंडेशनने ५१ टन चारा वाटपाचा उपक्रम राबविला आहे. वाढदिवसाचा सोहळा केवळ शुभेच्छा आणि सत्कारापुरता मर्यादित न ठेवता, गरजू शेतकरी व त्यांच्या मुक्या जनावरांसाठी मदतीचे पाऊल उचलत एक आदर्श निर्माण करण्यात आला आहे.

प्रमुख उपस्थिती

या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत, सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार, रणजीतसिंह शिंदे, नगरसेवक मनीष केत आणि नगरसेवक किसन जाधव यांची विशेष उपस्थिती होती. तसेच देवपुष्प फाउंडेशनचे सहकारी अध्यक्ष सागर गवळी, सल्लागार महेश वाघमारे, समर्थ नरवडे, रोहित परदेशी यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘गरजूंची सेवा, हीच वाढदिवसाची खरी भेट’

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यामागे गाभाभूत सामाजिक बांधिलकी असल्याची भावना फाउंडेशनचे संस्थापक व भाजपा युवा नेते राहुल देवानंद काटकर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, “वाढदिवस केवळ पुष्पगुच्छ आणि शुभेच्छांनी नव्हे, तर गरजूंच्या सेवेतून साजरा व्हावा. बळीराजावर संकट ओढवले असताना त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हीच खरी सामाजिक प्रगल्भता आहे.”

दुष्काळाच्या या कठीण काळात शेतकरी बांधवांच्या पशुधनाला चारा मिळाल्यास त्यांना खूप मोठा आधार मिळणार आहे. पशुधन हे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन असल्याने, त्याचे संगोपन टिकवून ठेवण्यासाठी अशा समाजोपयोगी उपक्रमांची नितांत आवश्यकता आहे. देवपुष्प फाउंडेशनच्या या उपक्रमाने सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश देत शेतकरी वर्गाला मोठा दिलासा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : सण साजरा करायला गेलेले परतलेच नाही! २४ तासांत ४९ जणांचा मृत्यू; भीषण घटनांनी देश हादरला

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात सोनं किती रुपयांनी स्वस्त; वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

SCROLL FOR NEXT