kolhapur ambabai saam tv
महाराष्ट्र

Ambabai Temple Kolhapur : करवीर निवासिनी श्री अंबाबाई दर्शनाबाबत पालकमंत्री केसरकरांचा माेठा निर्णय, भाविकांना...

मंत्री केसरकर यांच्यासमवेत मान्यवर देखील मंदिरात आले हाेते.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur Ambabai Temple News : कोरोना काळापासून करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन भाविकांना गाभाऱ्यातून घेता येत नव्हते. केवळ मान्यवरांना देवीचे दर्शन गाभा-यातून दिले जात असे. दरम्यान आज पालकमंत्री दीपक केसरकर (kolhapur guardian minister deepak kesarkar) यांनी आज (साेमवार) आई अंबाबाईचं दर्शन सर्वांना गाभा-यातून देण्याची घाेषणा केली आहे. (Maharashtra News)

कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर हे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. आज सकाळी मंत्री दीपक केसरकर यांनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj Kolhapur), शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक (mp sanjay mandlik) देखील महालक्ष्मी मंदिरात आले हाेते.

यावेळी माध्यमांशी बाेलताना केसरकर यांनी महालक्ष्मी भक्तांसाठी खुशखबर दिली. ते म्हणाले करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन कोरोनामुळे भाविकांना पितळी उंबऱ्याच्या बाहेरूनच देण्यात येत होतं. उद्यापासून अंबाबाईचे दर्शन थेट गाभाऱ्यातून भक्तांना घेता येईल.

दरम्यान या घोषणेनंतर अंबाबाई भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. अनेक महिला भाविकांनी साम टीव्हीशी बाेलताना या निर्णयाचे स्वागत केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज ठाकरे ठाणे कोर्टात हजर

NEET पेपर फुटी प्रकरणात मोठी अपडेट; भाजप नेत्याला अटक, माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने खळबळ

Swapna Shastra Tips: 'ही' ५ स्वप्ने चुकूनही कुणाला सांगू नका

Pune Crime: पुणे हादरले! आईच्या बॉयफ्रेंडची हत्या, मुलीच्या प्रियकराने डोक्यात दगड घालून जागीच संपवलं

Jio Recharge: 200 रुपयांपेक्षाही कमी किमतीत दिवसाला मिळेल 2GB डेटा, Jioचा जबरदस्त रिचार्ज प्लान

SCROLL FOR NEXT