Devendra Fadnavis-Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

Political News : शिवसेनेच्या जाहिरातीचे साईड इफेक्ट्स; फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांसोबतचे जाहीर कार्यक्रम आजही टाळले?

Devendra Fadnavis Upset After Shivsena Advertise : देवेंद्र फडणवीस यांच्या स्वतःच्या आजच्या कार्यक्रम यादीत एसटीच्या कार्यक्रमाचा उल्लेख नाही.

साम टिव्ही ब्युरो

रुपाली बडवे

Mumbai News : शिवसेनेच्या 'राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे' या जाहिरातीचे राजकीय साईड इफेक्ट्स दिसू लागले आहेत. काल कोल्हापूर दौरा रद्द केल्यानंतर उपमुख्यमंत्री शिवेसनेच्या जाहिरातीवरुन नाराज असल्याची चर्चा सुरु होती. मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या आणखी एका कार्यक्रमात फडणवीसांनी जाणं टाळल्याने आता चर्चांना आणखी ऊत आला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाराजी कायम असल्याचं दिसून येत आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे जाहीर कार्यक्रम आजही टाळले आहेत.

आज वाय बी चव्हाण सेंटर येथे सायंकाळी एसटीचा अमृतमहोत्सवी वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे, तर देवेंद्र फडणवीस मुख्य अतिथी आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या स्वतःच्या आजच्या कार्यक्रम यादीत एसटीच्या कार्यक्रमाचा उल्लेख नाही. (Latest Marathi News)

त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचासोबतचे कार्यक्रम टाळले की काय अशी चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, सह्याद्रीवर शासकीय बैठकांना मात्र देंवेंद्र फडणवीस हजेरी लावणार आहेत. (Maharashtra Political News)

अकोला सभा आणि धाराशिव दौराही रद्द

साम टीव्हीच्या सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज बाहेर देखील दौरे होते. पण डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ते मोठ्या सभा आणि विमान प्रवास टाळत आहेत. मोदी @९ च्या कार्यक्रमामुळे एसटी अमृतमहोत्सवाचा कार्यक्रम भाग न घेतल्याची माहिती मिळत आहे. तसेच आजची अकोला सभा आणि उद्याच्या धाराशिव येथील सभेला देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार नाहीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT