Manoj Jarange Patil  Saam Digital
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : माझ्यावर पुन्हा हल्ला घडवून आणण्याचा डाव ...; मनोज जरांगे पाटीलांचा खळबळजनक दावा

Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis : संभाजीनगरमध्येच भाजपच्या महिलांना पाठवून माझ्यावर फडणवीस यांना हल्ला करायचा होता. मात्र त्यांचा तो डाव फसला आहे, असं जरांगे पाटील म्हणालेत.

Ruchika Jadhav

लक्ष्मण सोळुंके

Maratha Aarakshan :

माझ्यावर हल्ला घडवून आणण्याचा डाव आहे. आधीचा डाव फसला मात्र आता पुन्हा तसा डाव आखला जात आहे, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा खळबळजनक दावा केलाय. जरांगे पाटलांनी केलेल्या या दाव्यामुळे मराठा बांधवांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

जरांगे पाटील आजपासून दोन दिवसांच्या संवाद दौऱ्यावर जात आहेत. दौऱ्यावर निघण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलताना हा गंभीर आरोप केलाय. संभाजीनगरमध्येच भाजपच्या महिलांना पाठवून माझ्यावर फडणवीस यांना हल्ला करायचा होता. मात्र त्यांचा तो डाव फसला आहे, असं जरांगे पाटील म्हणालेत.

फडणवीसांचा तो डाव फसला असला तरी आता पुन्हा भाजपच्या कार्यकर्त्याकडून माझ्यावर हल्ला करण्याचा डाव देवेंद्र फडणवीसांनी आखलाय, असा खळबळजनक आरोप जरांगे पाटील यांनी केलाय. दौऱ्यासाठी मी पुन्हा बाहेर निघालो आहे.अत्ता तुम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांना आम्हाला अडवायला सांगा. मी घाबरत नाही, असं आव्हान त्यांनी या वेळी देवेंद्र फडणवीस यांना केलं आहे.

फडणवीस काल स्वत:हून तुतारी वाजवायला गेले

आमच्या मागे तुतारी आहे असं फडणवीस म्हणाले होते. तेच फडणवीस काल पुढे येऊन तुतारी वाजवायला गेले. अत्ता हे सगळे एका ताटात जेवत आहेत. पोलिसांचे कान भरून फडणवीस मराठा समाजातील तरुणांनावर केस करत आहेत. बॅनर काढायला लावत आहेत. त्यांना अत्ता आमच्या भिंतीवर पॅम्प्लेट चिटकवायला यायचं नाही का? लावा अत्ता कसे आमच्या दारात येऊन निवडणुकीचे पॅम्प्लेट चिटकवता ते बघतो, असा इशारा जरांगेंनी फडणवीसांना दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT