Maharashtra Politics Saam Tv News
महाराष्ट्र

Raj Thackeray: अमित ठाकरे राज्यपाल नियुक्त आमदार होणार? फडणवीस-राज ठाकरेंच्या भेटीनंतर चर्चेला उधाण

Devendra Fadnavis meets Raj Thackeray: भाजप-मनसेमध्ये युती होणार? असे प्रश्न निर्माण होत असताना राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना भाजप राज्यपाल कोट्यातून आमदारपदी नियुक्ती करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Bhagyashree Kamble

राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शिवतीर्थावर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर या दोन दिग्गज नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.

भाजप-मनसेमध्ये युती होणार का? असे प्रश्न निर्माण होत असताना राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना भाजप राज्यपाल कोट्यातून आमदारपदी नियुक्ती करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट अँड गाईड हॉलमधील शिवाजी पार्कमध्ये परीक्षा पे चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार होते. त्याआधी मुख्यमंत्री यांनी शिवतीर्थावर जात राज ठाकरे यांची भेट घेतली. दरम्यान, या दोन्ही नेत्यांमध्ये २० मिनिटं चर्चा झाली.

आगामी स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर या भेटीला अधिक महत्त्व आलं आहे. भाजप - मनसेमध्ये युती होणार का? असे प्रश्न राजकीय वर्तुळात रंगली आहे. या भेटीनंतर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना भाजपच्या कोट्यातून विधान परिषदेवर पाठवण्यात येण्याची शक्यता आहे. सध्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या एकूण १२ जांगापैकी ५ जागा रिक्त आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप मनसेची साथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भाजप मनसेसाठी काही जागा सोडू शकतं, अशी चर्चा आहे. भाजप राज्यपाल कोट्यातून आमदार म्हणून अमित ठाकरे यांना संधी देण्याची शक्यता आहे. अमित ठाकरे यांना विधान परिषदेवर आमदार करून भाजप आणि मनसेमध्ये मैत्री होणार का? हे येत्या काळात स्पष्ट होईल.

विधानसभेत पराभव

अमित ठाकरे यांनी पहिल्यांदा माहीम मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवली होती. माहीममध्ये तिरंगी लढत झाली होती. ठाकरे गटातील महेश सावंत, सदा सरवणकर आणि अमित ठाकरे यांच्यात काटे टक्कर पाहायला मिळाली. मात्र, विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांनी मैदान मारलं. माहीमकरांनी त्यांना साथ दिली. विधानसभा निवडणुकीत अमित ठाकरे यांचा पराभव झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai minors missing: ३६ तासांत १२ अल्पवयीन मुलं बेपत्ता; मुंबईतल्या या भागांतून मुलं होतायत गायब

Maharashtra Live News Update: नागपूर महापालिकेवर महिलाराज

Maharashtra Politics: अजितदादांचा पक्ष अमित शहांचा गुलाम झालाय, संजय राऊतांचं मोठं विधान

Mahesh Babu Daughter : 13 वर्षांची सितारा मोठ्या बॉलिवूड Divas ना देतेय टक्कर; महेश बाबूच्या लेकीचा रॅम्पवर जलवा, पाहा VIDEO

Police Viral Video : खाकीतला देव माणूस! फुटपाथवर राहणाऱ्या मुलासाठी दाखवली माणुसकी; साडीचा झुला पाडला अन्...

SCROLL FOR NEXT