Sindhutai Sapkal and Devendra Fadnavis SaamTvnews
महाराष्ट्र

Sindhutai Sapkal यांच्या निधनाने मातृतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले : देवेंद्र फडणवीस

वात्सल्यसिंधू, राज्यातील अनेक अनाथांची माय सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांच्या निधनाने आज महाराष्ट्र खरोखरच एका ज्येष्ठ समाजसेविकेला मुकला आहे.

Krushnarav Sathe

मुंबई : वात्सल्यसिंधू, राज्यातील अनेक अनाथांची माय सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांच्या निधनाने आज महाराष्ट्र खरोखरच एका ज्येष्ठ समाजसेविकेला मुकला आहे. त्यांच्या निधनाने मातृतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. (Sindhutai Sapkal Latest News Highlights)

मूळ विदर्भात, वर्ध्यात जन्मलेल्या सिंधूताईंचे आयुष्य अतिशय खडतर, पण त्यांनी त्या संघर्षातून समाजातून अव्हेरल्या गेलेल्यांसाठी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले. ममता बालसदनच्या माध्यमातून त्यांनी अनेक अनाथांना आश्रय दिला. अनेक संस्था त्यांनी उभारल्या. मी मुख्यमंत्री असताना अनेकदा त्या भेटायला येत. या माध्यमातून त्यांच्या कार्याला हातभार लावता आला, याचे समाधान आहे. पण प्रत्येक वेळी ममतापूर्ण आणि अतिशय मायेने त्या विचारपूस करायच्या, हे अधिक स्मरणात आहे.

त्यांच्या जाण्याने मनाला अतिशय वेदना होत आहेत. पद्मश्री पुरस्कार, अनेक कामे आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेली. पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील कायम स्मरणात रहावे, असा त्यांचा कनवाळू स्वभाव, मायेने डोक्यावर हात फिरवणे, ममतेने भरभरून आशीर्वाद देणे, याची आज प्रकर्षाने आठवण होते आहे. महाराष्ट्र आज एका मातेला मुकला आहे. त्यांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. महाराष्ट्राच्या दुःखात मी सहभागी आहे, अशा भावना देवेंद्र फडणवीस (Devendfra Fadnavis) यांनी व्यक्त केल्या आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: मतभेदांपेक्षा महाराष्ट्र महत्वाचा; भर सभेत राज ठाकरे यांची भावनिक साद

kiwi Benefits: किवी फळाचे असंख्य फायदे!

VIDEO : पावसात सभा झाल्यावर निवडून येतात; भाषणावेळी पाऊस आला, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण

Kalyan News : कल्याण-डोंबिवलीत ४० जण तडीपार; ऐन निवडणुकीत पोलिसांची धडक कारवाई

SCROLL FOR NEXT