एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील कोल्डवॉर अद्याप सुरूच आहे. आता ९०० कोटी रूपयांच्या प्रकल्पावरून शिवसेना आणि भाजप आमनेसामने आले आहेत. एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिलेल्या प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहेत.
गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये धुसपूस सुरू असल्याच्या चर्चा आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कोल्डवॉर सुरू आहे. मुख्यमंत्रिपद, गृहमंत्रिपद, पालकमंत्रिपद त्यानंतर आमदारांची सुरक्षा याप्रकरणावरून शिवसेना आणि भाजपमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. आता त्याचा पु्ढचा पडाव पडला असून दोन्ही पक्ष आता ९०० कोटींच्या प्रकल्पांवरून आमनेसामने आलेत. आता एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिलेल्या ९०० कोटींच्या प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे समोर आले आहे.
मुख्यमंत्री सचिवालयाकडून सिडकोच्या प्रकल्पांच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेत. मुंबई पालिकेलीतल घन कचऱ्यांचं टेंडर रद्द करण्यात आले आहे. जालन्यातील सिडकोच्या प्रकल्पाची चौकशी करा, असे आदेश मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात आली आहेत. जालना येथील सिडकोचा हा प्रकल्प ९०० कोटी रूपयांचा असून याला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना मंजुरी दिली होती.
शिंदेंच्या काळातील अनेक प्रकल्प देवेंद्र फडणवीस यांच्या रडारावर असल्याचं सांगितलं जात आहे, त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे यांच्यातील कोल्ड वॉर सुरूच असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, हा सरकारचा अंतर्गत विषय आहे. आधीच्या सरकारनं काही भ्रष्टाचार घोटाळा केला असेल राज्याला फसवलं असेल. देवेंद्र फडणवीस यांच्यातील सच्चा माणूस जागा झाला असेल जर त्यांना या सगळ्याची चौकशी करावी, अशी वाटत असेल त्याचे स्वागत केलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांचे शिवजयंती निमित्तचे भाषण ऐकलं असेल.
रयतेच्या देठालाही हात लावू नका. म्हणजे एक रुपयाचा भ्रष्टाचार करू नका किंवा सहन करू नका. जर छत्रपती यांचा विचार घेऊन जे लोक सरकारमध्ये लूट करत आहे त्यांना थांबवत आहेत, तर त्याचा आम्ही नक्की स्वागत करू असं राऊत म्हणालेत. तर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेवट्टीवार यांनी या प्रकरणावरून महायुती सरकारवर टीका केलीय.
मुख्यमंत्र्यांनी जालन्यातील प्रकल्पांच्या चौकशीचे आदेश दिले असतील तर हे विभाग शिंदेंकडे आहे. यावर तत्कालीन मुख्यमंत्री निविदा काढते. आज शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत. तुझं माझं जमेना, तुझ्या विना करमेना अशी परिस्थिती सध्या दिसून येत असल्याची टीका वडेवट्टीवार यांनी केलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.