Devendra Fadnavis Criticized Uddhav Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंना तोंडाच्या वाफा काढण्याशिवाय काही जमत नाही; देवेंद्र फडणवीसांची टीका

Devendra Fadnavis on uddhav thackeray : उद्धव ठाकरेंनी गोप्यस्फोट केल्यानंतर देवेंद्र फडणवीनी कठोर शब्दात टीका केली आहे. 'उद्धव ठाकरेंना तोंडाच्या वाफा काढण्याशिवाय यांना काही जमत नाही, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी टीका केली आहे. ते नागपुरात बोलत होते.

Vishal Gangurde

पराग ढोबळे, नागपूर

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत भाजपनेच युती तोडल्याचे म्हणत भाजपचे वरिष्ठ नेते आणि देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती. उद्धव ठाकरेंनी गोप्यस्फोट केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी कठोर शब्दात टीका केली आहे. 'उद्धव ठाकरेंना तोंडाच्या वाफा काढण्याशिवाय यांना काही जमत नाही, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी टीका केली आहे. ते नागपुरात बोलत होते.

देवेंद्र फडणवीस हे आज नागपुरात होते. फडणवीसांनी नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'हे सगळे निराश झाले आहेत. पराभवाच्या भीतीने हे शिव्या द्यायला लागलेले आहेत. जेव्हा जेव्हा मोदींजींना शिव्या पडतात, तेव्हा त्यांचा जय जयकार होतो'.

उद्धव ठाकरेंवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून एक केलेलं काम दाखवावं. मुंबईत पंचवीस वर्षे महानगरपालिका होती, त्यांनी केलेलं एक काम दाखवावं. त्यांना तोंडाच्या वाफा काढण्याशिवाय काही जमत नाही. त्यांचे भाषण ठरलेले आहे. उद्धव ठाकरेंचं भाषण जसेच्या तसे मी म्हणून दाखवू शकतो, असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टेकडी रोडवरील हनुमान मंदिरात बजरंगबली जयंतीनिमित्त दर्शन घेतलं. यानंतर ते म्हणाले, 'बजरंगबली बुद्धी आणि शक्ती देतात. त्यांना बुद्धी मागितली आहे. देशावर जे काही संकट येतात ते दूर करण्यासाठी आणि आमच्यासाठी बुद्धी आणि आमच्या विरोधकांसाठी सुबुद्धी मागितलेली आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुणेकरांवरील 5 टक्क्यांवरील करवाढ रद्द

Shocking : धक्कादायक! सावत्र भावानेच नेलं बहिणीला पळवून; असा सापडला पोलिसांच्या जाळ्यात

Aloe Vera Juice: घरी कोरफडचा रस कसा बनवायचा? सोपी आहे पद्धत

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! आज वाहतुकीत मोठे बदल, 'हे' आहेत पर्यायी मार्ग

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या रखडलेल्या हप्त्याबाबत सरकारच्या हालचाली;₹१५००बाबत मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT