Devendra Fadnavis News Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Nashik : नाशिकमध्ये जाणीवपूर्वक दंगल घडवण्यात आली, देवेंद्र फडणवीस यांचा रोख कुणाकडे?

Devendra Fadnavis News : नाशिकमध्ये अतिक्रमण कारवाईदरम्यान जाणीवपूर्वक दंगल घडवण्यात आल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. दगडफेक करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

Namdeo Kumbhar

Devendra Fadnavis on Nashik Riots : नाशिकमध्ये जाणीवपूर्वक दंगल घडवण्यात आली, दगडफेक करण्यात आल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते बीडमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना नाशिक दंगलीमधील सहभागी असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असे सांगितले.

नाशिकमध्ये कोर्टाच्या निर्णायानंतर अतिक्रमण काढण्यात येत होते. तेथील लोकांनी त्याला पाठिंबा दर्शवला होता,पण काही लोकांनी जाणीवपूर्वक विरोध केला अन् दंगल घडवून आणली असा खळबळजनक आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?

नाशिकमध्ये नियोजन पद्धतीने दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला आहे. न्यायालयाच्या निर्णायानंतर तेथील लोकांनी स्वत:हून अतिक्रमण काढण्यासंदर्भात पोलिसांना सांगितले होते. अतिक्रमण काढण्यासाठी त्या लोकांनी सुरूवात केली होती. पण त्याच वेळी दंगलीमध्ये दिसणाऱ्या लोकांनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दगडफेक केली, दंगा केला. त्यामुळेच त्यांच्यावर कडक कारवाई केली जात आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नाशिकमध्ये त्या रस्त्यावरील बॅरीकेट्स ४ दिवसानंतर हटवले -

नाशिकच्या काठे गल्ली सिग्नल परिसरातील रस्ता अखेर वाहतुकीसाठी आजपासून खुला झाला आहे. ४ दिवसानंतर पोलीसांनी रस्त्यावरील बॅरीकेट्स हटवले आहेत. काठे गल्ली सिग्नल परिसरातील अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी रस्ता बंद करण्यात आला होता. मात्र अनाधिकृत बांधकामावरील कारवाईनंतर शहरात कोणताही अनुचित न घडल्याने पोलिसांनी रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे. दरम्यान पोलिसांनी रस्ता वाहतुकीसाठी खुला केला असला तरी देखील अनधिकृत बांधकाम परिसरात पोलिसांचा बंदोबस्त मात्र कायम आहे.

१५०० जणांविरोधात गुन्हा दाखल

नाशिकच्या काठे गल्ली सिग्नल परिसरातील अनधिकृत बांधकाम दगडफेक प्रकरणातील सर्व ३७ संशयित आरोपींना आज एकत्रित कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दगडफेक प्रकरणी १५०० जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. तर आत्तापर्यंत ३७ आरोपी अटकेत आहेत. संशयित आरोपींमधील महाविकास आघाडीचे तीन प्रमुख पदाधिकारी अद्यापही फरार आहेत. तर MIM पक्षाचा शहराध्यक्ष अटकेत आहे. नाशिकच्या अनधिकृत बांधकाम आणि दगडफेक प्रकरणी राजकीय कनेक्शन समोर आले आहे. न्यायालयाच्या आजच्या सुनावणीकडे लक्ष लागलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

SCROLL FOR NEXT