देवेंद्र फडणवीस यांच्या पंतप्रधानपदाच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे.
केंद्रातील मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता
जय वडेट्टीवार यांनी फडणवीस पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली.
महाराष्ट्रासह देशातील राजकारणात मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केंद्रात मोठं पद मिळणार असल्याची शक्यता आहे. दुसरीकडे फडणवीस हे पंतप्रधान व्हावेत. मराठी माणूस पंतप्रधानपदी बसणार असेल तर आनंद वाटेल,अशी विधानं विरोधकांकडून होत असल्यानं फडणवीस देशाचे नवे पंतप्रधान होणार असल्याच्या चर्चेला नव्यानं फोडणी मिळालीय.
गेल्या काही दिवसांपासून फडणवीस यांच्या दिल्लीतील वाऱ्या अचानक वाढल्या आहेत. त्यामागील कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत एक मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलीय. भाजपच्या सर्वात ताकदवर मानल्या जाणाऱ्या 'केंद्रीय संसदीय बोर्डावर' फडणवीस यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.
दुसरीकडे फडणवीस पंतप्रधान होणार असल्याच्या चर्चांनी धुराळा उडालाय. देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा स्वपक्षातील नेत्यांपेक्षा विरोधातील नेत्यांना अधिक आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे गेले काही दिवासांपासून देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होणार असून त्याबाबत हालचालींना वेग असल्याचा दावा करत आहेत.
देवेंद्र फडणवीसांवर विरोधक मुख्यमंत्री म्हणून टीका करत असले तरीही फडणवीसच त्यांच्या मनातले भावी पंतप्रधान आहेत. फडणवीस पंतप्रधान व्हावे अशी आमची इच्छा आहे असं विधान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय. तर दुसरीकडे फडणवीसांनी दिल्लीला जायची आवराआवरी सुरू केलीय. ते आपल्या मर्जीतील नेत्यांना योग्य जागेवर बसवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीकडे मार्गस्थ होतील, असं संजय राऊत म्हणालेत.
देवेंद्र फडणवीस यांचे भाजपमधील वाढते वजन पाहता आणि राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्वाचा प्रभावामुळे २०२९ नंतर किंवा त्यापूर्वी केंद्रात त्यांची वर्णी लागू शकते असा अंदाज राजकीय विश्लेषक व माध्यमांद्वारे व्यक्त केले जात आहेत. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत झालेल्या सलग निवडणुकांमध्ये पक्षाला मिळवून दिलेल्या घवघवीत यशामुळे देवेंद्र फडणवीस यांचे भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वातील स्थान आणि महत्त्व कमालीचे वाढले आहे. सध्या ते भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.