amravati , devendra bhuyar , shivaji shikshan sanstha election
amravati , devendra bhuyar , shivaji shikshan sanstha election saam tv
महाराष्ट्र

Amravati : शिवाजी शिक्षण संस्था निवडणुकीत राडा; मी इथंच थांबणार, आमदार भुयार म्हणाले...

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

Devendra Bhuyar : मी मतदान प्रतिनिधी आहे. मी मतदान केंद्रात थांबणारच आहे. या देशात लाेकशाही आहे. ही संस्था फुले, शाहू , आंबेडकर यांच्या विचाराची जाेपासना करणारी संस्था आहे. या संस्थेत चुकीची काही घडणार नाही असा विश्वास आमदार देवेंद्र भुयार यांनी स्पष्ट केले. अमरावती येथील शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरु आहे. या प्रक्रिये दरम्यान दाेन गटात राडा झाला. यामध्ये आमदार भुयार यांना मारहाण झाल्याचा दावा करण्यात येत हाेता. त्यावर आमदार भुयार बाेलत हाेते. (shivaji shikshan sanstha election)

स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या शिवाजी शिक्षण संस्थेची निवडणूक आज होत आहे. मात्र अमरावती येथील शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयात सुरू असलेल्या मतदान केंद्रावर दोन गटात मतदान केंद्रात लॉबिंग होत असल्याच्या कारणावरून विकास पॅनलचे सदस्य पदाचे उमेदवार डॉ.दिनकरराव गायगोले यांचे बंधू रवींद्र गायगोले व प्रगती पॅनलचे सदस्य पदाचे उमेदवार हेमंत काळमेघ यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. हा वाद विकोपाला गेल्याने दोघेही एक दुसऱ्याच्या अंगावर धावून गेले. या वादात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी उडी घेतल्याने मतदान केंद्र परिसरात गोंधळ उडाला.

वरुड मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार व अकोटचे शिवसेनेचे माजी आमदार संजय गावंडे यांनीही या वादात उडी घेतली. त्यानंतर पोलिसांनी एकाला काठ्यांचा प्रसाद देत त्याला ताब्यात घेतले. परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढल्याने गाडगे नगर पोलीसानी बंदोबस्त वाढवला. घटनास्थळी ठाणेदार आसाराम चोरमले यांनी धाव घेत ॲक्शन मोडवर येत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

दरम्यान डॉ.दिनकर गायगोले व पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्यात वाद झाला. आमदार पंकज भोयर सुद्धा घटनास्थळी दिसून आले. शिवाय नरेशचंद्र ठाकरे यांचे चिरंजीव विक्रम ठाकरे हे ही घटनास्थळी पाहायला मिळाले. आमदार देवेंद्र भुयार हे मतदान केंद्राच्या आत असल्याने काहींनी आक्षेप नोंदवला, मात्र मी प्रतिनिधी असल्याने मी आत मध्ये होतो तर मला धक्काबुक्की झाली नाही असं देवेंद्र भोयर यांनी सांगितले

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Online Ration Card : घरबसल्या बनवा तुमचं रेशन कार्ड; कसं? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Agriculture News : उन्हाळी मुगावर करपा रोगाचा प्रादुर्भाव; उत्पादनात घट होण्याची शक्यता

Sharad Pawar: भारी गडी दिसतोय, लक्ष ठेवलं पाहिजे.. शरद पवारांनी सांगितला 'आर.आर.आबांच्या' राजकीय एन्ट्रीचा किस्सा!

PM Modi Speech: 'चहा विक्रेत्याने देशाची अर्थव्यवस्था ११ वरून ५व्या क्रमांकावर आणली'; पीएम मोदींनी गुजरातमध्ये काय सांगितलं?

1000 Cr. Earn Indian Films : १००० कोटी कमावलेले हिंदी चित्रपट तुम्ही पाहिले का ?, पाहा यादी

SCROLL FOR NEXT