Devendra Bhuyar & Raju Shetti saam tv
महाराष्ट्र

Devendra Bhuyar: फालतू गाेष्टींसाठी वेळ नाही; राजू शेट्टींना भुयारांचा टाेला

महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय ५ एप्रिलला घेऊ असेही राजू शेट्टींनी नमूद केले.

अरुण जोशी

अमरावती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांची गुरुवारी पक्षातून हकालपट्टी केली. त्यावर आमदार देवेंद्र भुयार यांनी त्याबाबत मला फारसे काही बाेलायचे नाही असे स्पष्ट केले. मला फालतू गाेष्टींवर लक्ष ठेवण्यास वेळ नाही, मतदारसंघाचा विकास माझ्यासाठी महत्वाचा आहे असा टाेला आमदार देवेंद्र भुयार यांनी त्यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांचे नाव न घेता लगावला आहे. (Devendra Bhuyar Latest Marathi News)

देवेंद्र भुयार हे गेल्या कित्येक दिवसांपासून पक्षप्रमुखांच्या संपर्कात नव्हते. पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाला येत नव्हते. यावरून मतदारसंघातही त्यांच्या विरोधात नाराजीचा सूर होता. अखेर हिवरखेड येथे पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष प्रमुख राजू शेट्टी यांनी गुरुवारी आमदार देवेंद्र भुयार यांच्या हकालपट्टीची घोषणा केली. या घाेषणेनंतर (decision) कार्यकर्त्यानी ढोल वाजवत, फटाके फोडत आंनद साजरा केला.

या कारवाईबाबत आमदार देवेंद्र भुयार यांनी फेसबुक पोस्ट करीत “धन्यवाद’ असे म्हटले. ही कारवाई काही नवीन नाही. जे सर्वांसोबत झाले तेच माझ्या सोबत ही झाले असे त्यांनी नमूद केले आहे. मी मतदार संघातील कामांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे असेही स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

OBC/ Maratha Reservation: मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आखणी एक आव्हान; उपराजधानीत निघणार भव्य मोर्चा

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

Actor Arrested: बलात्काराचा आरोप अन्...; 'या' प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला न्यायालयीन कोठडी, वाचा नेमकं प्रकरण

Shocking : जिगरी यार गद्दार निघाला! रात्री बायकोसोबत बेडवर; रागात नवऱ्याने मित्राचा गळाच चिरला

SCROLL FOR NEXT