pandharpur, vitthal rukmini mandir, bharat patankar saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Vitthal Rukmini Mandir : हिंदुत्ववाद्यांचा पंढरीतील डाव हाणून पाडणार : डाॅ. भारत पाटणकर

विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद करावी अशी मागणी ही पाटणकर यांनी केली.

भारत नागणे

Pandharpur Vitthal Mandir : गेल्या 48 वर्षांनंतर पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर बडवे उत्पातांच्या ताब्यातून मुक्त झाले आहे. पुन्हा विठ्ठल रुक्मिणी मंदिर बडवे उत्पातांच्या ताब्यात देण्यासाठी काही हिंदूत्ववादी मंडळींचा प्रयत्न सुरू आहे. परंतु त्यांचा हा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, प्रसंगी या विरोधात जनआंदोलन उभा करू असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे नेते डाॅ. भारत पाटणकर (bharat patankar) यांनी पंढरपूरात (pandharpur) दिला.

विठोबा रखुमाई मुक्तीदिनाच्या निमित्ताने श्रमीक मुक्ती दलाच्या वतीने पंढरपुरात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डाॅ. भारत पाटणकर यांनी सुब्रमण्यम स्वामी यांना हा इशारा दिला आहे. काही दिवसांपुर्वी भाजपचे (bjp) माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथील बडवे उत्पातांच्या ताब्यात यावे यासाठी सुप्रीम कोर्टात नव्याने‌ याचिका दाखल केली जाईल असे जाहीर केले आहे. त्यावर डाॅ. पाटणकर बाेलत हाेते.

आषाढी, कार्तिकीच्या वेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणारी महापूजा बंद करून दर्शन रांगेतील भाविकांच्या हस्ते महापूजा करावी अशी मागणी त्यांनी केली. सरकारने विठ्ठल मंदिर समितीची नव्याने लवकरच घोषणा करावी. पंढरपूरातील (pandharpur) विठ्ठल मंदिर मुक्तीसाठी राज्यभरात ठिकठिकाणी मेळावे घेतले जातील असेही यावेळी पाटणकर यांनी जाहीर केले. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Holidays: पालकांसाठी महत्त्वाची बातमी! एप्रिल महिन्यात इतके दिवस शाळांना सुट्टी; वाचा यादी

क्रूरतेचा कळस! साथीदाराची हत्या केली, शीर धडावेगळे करून नदीत फेकले अन्...

Historic Places : नर्मदा तटावरील राजेशाही वैभव, 'या' किल्ल्याचे रूपांतर झाले लग्जरी हॉटेलमध्ये, पर्यटकांची होते गर्दी

Bollywood Property: मलाइकाने अलिशान फ्लॅट दिला रेंटवर, इकडे सारा अन् माधुरीनं घर घेतलं भाड्याने, कितीची झाली उलाढाल?

Sonam Kapoor Baby Photo : बाळाला हातात घेताच सोनम कपूर भावुक, अनिल कपूरच्या नातवाची पाहा पहिली झलक

SCROLL FOR NEXT