Mahaparinirvan Din 2023 Saam TV
महाराष्ट्र

Mahaparinirvan Din 2023: दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याची मागणी; भीम आर्मीचे आंदोलन

Demand to Rename Dadar Station: दादर रेल्वे स्थानकाला बाबासाहेब आंबेडकर, चैत्यभूमी नाव देण्यासाठी अनेक वर्षापासून मागणी सुरू आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी बऱ्याचवेळा बैठका घेण्यात आल्यात.

Ruchika Jadhav

Dr. Babasaheb Ambedkar:

भारतीय घटनेचे शिल्पकाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज दादरमध्ये लाखोंच्या संख्येने अनुयायी दाखल झालेत. दरवर्षी मोठ्या संख्येने जनसागर येथे दाखल होत असतो. दादर येथे चैत्यभूमीला जाऊन अनुयायी अभिवादन करतात. अशात दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याची मागणी जोर धरू लागलीये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दादरमध्ये (Dadar) चैत्यभूमी असल्याने येथील नागरिकांसह भीम आर्मीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दादर रेल्वे स्टेशनला मिळावे अशी मागणी करण्यात येत आहे. दादर रेल्वे स्थानकाला बाबासाहेब आंबेडकर, चैत्यभूमी नाव देण्यासाठी अनेक वर्षांपासून मागणी सुरू आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी बऱ्याचवेळा बैठका घेण्यात आल्यात.

नावाची मागणी मान्य व्हावी यासाठी योग्य ते प्रयत्न केले जाताय, असं अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे. मात्र अद्यापही दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यात आलेले नाही. त्यामुळे या मागणीसाठी आज ६ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजत भीम आर्मीचे संविधानिक मार्गाने आंदोलन आहे.

आज होणाऱ्या आंदोलनात पुन्हा एकदा शांततेच्या आणि संविधानाच्या मार्गाने दादर स्थानकाचे नाव बदलण्याची मागणी केली जाणार आहे.

पुण्यात आज बाबासाहेब आंबेडकरांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आलंय. बाबासाहेब आंबेडकर ज्या पुस्तक दालनात जाऊन पुस्तकं वाचायला किंवा खरेदी करायला यायचे त्याठिकाणी जाऊन मान्यवरांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. बाबासाहेब आंबेडकर १९३२ साली पुण्यात वास्तव्यास होते आणि यावेळी पुण्यातील डेक्कन जिमखान्यावरील 'इंटरनॅशनल बुक सर्व्हिस' येथे डॉ. नियमितपणे पुस्तक खरेदीसाठी येत असत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसची सावध भूमिका

Winter Hair Care : थंडीमध्ये केस गळणे थांबवण्यासाठी करा हे घरगुती सोपे उपाय

Saturday Rules: शनिवारी केस कापावे की नाही?

Government Job Scam : सरकारी नोकरीचं आमिष, १५ लाख घेतले; बनावट जॉइनिंग लेटरही दिलं, धक्कादायक प्रकार उघड

Prasar Bharti Recruitment: आनंदाची बातमी! दूरदर्शन केंद्रात नोकरीची सुवर्णसंधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT