शिवसेनेपाठोपाठ शेकापचाही राष्ट्रवादीवर हल्लाबोल; आदिती तटकरेंच्या राजीनाम्याची केली मागणी राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

शिवसेनेपाठोपाठ शेकापचाही राष्ट्रवादीवर हल्लाबोल; आदिती तटकरेंच्या राजीनाम्याची केली मागणी

"मढयाच्या टाळूवरील लोणी खाण्याचा हा प्रकार असून याची जबाबदारी घेऊन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पदाचा राजीनामा द्यावा"

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर -

रायगड : राज्यात महाविकास आघाडीमध्ये MVA सत्तेत मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेपाठोपाठ Shivsena रायगड जिल्हा परिषदेतील सत्तेत मित्रपक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षानेही राष्ट्रवादी काँग्रेसला NCP घेरण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून महाड - पोलादपूर तालुक्यातील पुरग्रस्तांसाठी आलेल्या मदतीचे वाटप जिल्ह्यातील अन्य तालुक्यात करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप शेकापने केला आहे. (Demand for resignation of Aditi Tatkare)

जिल्ह्याच्या विविध तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अंगणवाडी सेविकांना किट वाटप करण्यात येत आहे. हे किट पुरग्रस्तांसाठी flood victims आले होते. त्यावर 'सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान पुरग्रस्तासाठी मदत असे स्टिकर दिसत आहे. मढयाच्या टाळूवरील लोणी खाण्याचा हा प्रकार असून याची जबाबदारी घेऊन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पदाचा राजीनामा द्यावा' अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे. जर आदिती तटकरे Aditi Tatkare यांनी राजीनामा दिला नाही तर आपण मुख्यमंत्री Chief Minister, राज्यपाल Governor यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे शेकापचे माणगाव तालुका चिटणीस रमेश मोरे Ramesh More यांनी सांगितले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Date: लाडकी बहीणींना eKYC कधीपर्यंत करता येईल?

Hair Growth Tips: केस गळणे ३० दिवसात थांबवा, ट्राय करा न्यूट्रिशनिस्टने सांगितलेले 'हे' हेल्दी फूड

Maharashtra Live News Update : प्रकाश आंबेडकर महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण कुटुंबीयांच्या सांत्वन पर भेटीला

शिंदे सेनेकडून ठाकरे गट अन् राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यांनी हाती धरलं धनुष्यबाण

Winter Makeup Tips: हिवाळ्यात लग्नानिमित्त मेकअप करताय? या गोष्टीची घ्या काळजी

SCROLL FOR NEXT