मुंबई पाठोपाठ नाशिकमध्येही मालमत्ता कर माफ करण्याची मागणी  Saam TV
महाराष्ट्र

मुंबई पाठोपाठ नाशिकमध्येही मालमत्ता कर माफ करण्याची मागणी

महासभेत ठराव मंजूर करून नागरिकांना दिलासा देणार असल्याची माहिती नाशिकचे (Nashik) महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली आहे.

अभिजीत सोनावणे

नाशिक : मुंबई पाठोपाठ नाशिकमध्येही 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ होण्याची शक्यता आहे. मुंबईच्या धर्तीवर नाशिकमध्येही 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची मागणी जोर धरत आहे. नाशिकच्या (Nashik Muncipal Corporation) महापौरांनी पालिका आयुक्तांना याबाबत पत्र लिहिले आहे. महापालिका हद्दीतील 500 चौरस फुटांच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. आगामी महासभेत मालमत्ता कर माफ करण्याचा ठराव सादर करण्याचं पत्रात म्हटले आहे. महासभेत ठराव मंजूर करून नागरिकांना दिलासा देणार असल्याची माहिती नाशिकचे (Nashik) महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन वर्षाचे स्वागत करत असताना जनतेला मोठे गिफ्ट दिले आहे, शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काल पहिल्यांदा जनतेसमोर लाईव्ह आले होते. नगरविकास खात्याची काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ऑनलाईन बैठक पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५०० चौरसफुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करत असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली होती.

५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करामध्ये माफी दिल्याने आता महापालिकेचा (Municipal Corporation) दरवर्षी ३४० कोटींचा कर आता बुडणार आहे. मुंबईत (Mumbai) ५०० चौरस फुटांचे जवळपास १५ लाख घरे आहेत. ज्यामध्ये २८ लाख कुटुंब राहत आहेत. या कुटुंबांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे मुंबईकरांना नव्या वर्षात हे मोठे गिफ्ट मिळाले आहे आणि याच पार्श्वभुमिवर नाशिक महानगरपालिकेत ही मागणी करण्यात आली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

SCROLL FOR NEXT