Nanded News  Saam TV
महाराष्ट्र

नांदेडात डॉलरच्या बदल्यात भारतीय चलनाची मागणी, टोळी गजाआड

नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

संतोष जोशी

नांदेड: एक बिलीयन डॉलर हे विदेशी चलन विक्री करण्याच्या उद्देशाने नांदेडमध्ये तेलंगणातील तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. यातील दोन आरोपी फरार होण्यात यशस्वी झालेत. भारतीय चलनाच्या बदल्यात एक बिलीयन डॉलरची नोट देण्यासाठी काही जण नांदेडमध्ये आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पथकाला गुरुद्वारा गेट क्रमांक एक जवळ एका इर्टीका कारमधील लोकांची झडती घेतली असता त्यांच्या जवळ अमेरिकेत चलनात असलेली एक बिलीयन डॉलरची नोट आढळून आली. ही नोट बनावट असल्याचा पोलिसांचा आंदाज असून बिलीयन नोट देऊन त्या बदल्यात भारतीय चलनातील रक्कम घेऊन पसार होण्याचा उद्देश होता.

मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या ठकबाजांचा डाव उधळत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. महेश वेटल्लूर, नंदकिशोर देवारस, आनंदराव गुंजी असं अटक केलेल्या आरोपींचीं नावे आहेत. अन्य दोघे फरार झालेत सर्व आरोपी तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्य़ातील रहिवासी आहेत. आरोपीं विरोधात वजिराबाद पोलीस ठाण्यात पाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून इर्टीका कारसह अकरा लाखांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी दिली आहे. या टोळीने आणखी कुणाला फसवले का याचा शोध पोलीस घेत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT