अवाजवी फी आकारणाऱ्या शाळांविरोधात कारवाई करण्याची मागणी जयेश गावंडे
महाराष्ट्र

अवाजवी फी आकारणाऱ्या शाळांविरोधात कारवाई करण्याची मागणी

अवाजवी फी आकारणाऱ्या शाळांविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी, आज अकोल्यातील मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आंदोलन करण्यात आले.

जयेश गावंडे

अकोला : अवाजवी फी आकारणाऱ्या शाळांविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज अकोल्यातील मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आंदोलन करण्यात आले. कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून देशभरात शाळा बंद आहेत. तरीही काही खाजगी शाळा विद्यार्थ्यांकडुन मोठ्या प्रमाणात फी वसूल करत आहेत. Demand for action against schools charging exorbitant fees

हे देखील पहा -

आधीच कोरोना लॉकडाऊनमुळे अनेकांचा व्यवसाय बुडाला, नोकरी गेली हाताला काम नाही. गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मात्र तरीही काही खाजगी शाळा पालकांकडून अवाजवी फी आकारत आहेत. या शाळांच्या विरोधात आज अकोल्यातील मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

सक्तीची फी वसुली करण्याकडे शाळा प्रशासनाने विशेष लक्ष घातलेले आहे. विद्यार्थ्यांच्या फी मध्ये तफावत आढळत आहे. पावतीवर फी चे वर्गीकरण न करता फक्त एकुण आकडा लिहून पावत्या दिल्या जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. शाळेतून नाव काढायचे म्हटले तर संबंधीत शाळेचे मुख्याध्यापक शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र देण्यास नकार देतात.

त्यामुळे शैक्षणीक फी मध्ये ५०% सवलत देण्यात यावी व कोरोना काळामधील शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ व शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ पर्यंत गरीब विद्यार्थ्यांची फी माफ करुन त्यांना मोफत शिक्षण देण्यात यावे. अकोल्यातील अनेक शाळांविरुध्द तक्रारी प्राप्त होत असूनदेखील शासन त्यांच्यावर कोणतीही कारवाई करीत नाही.

सरकार व शैक्षणिक संस्थांचे नक्की काय धागेधोरे आहेत ? असा सवाल यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आला. या संदर्भात मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश ढोरे यांच्या नेतृत्वात मोठया प्रमाणात निदर्शने करण्यात आली. यावेळी पालक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT