Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar: अजित पवारांविरोधात फेसबुकवर बदनामीकारक लिखाण, वडगाव निंबाळकर पोलिसात गुन्हा

नितीन संजय यादव यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

मंगेश कचरे

बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात फेसबुकवर बदनामीकारक लिखाण केल्याबद्दल वडगाव निंबाळकर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नितीन संजय यादव यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यावरुन वडगाव निंबाळकर पोलिसांनी फेसबुक अकाउंट धारकांवर आणि 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे (Defamatory post on Facebook against Ajit Pawar FIR In Wadgaon Nimbalkar Police).

16 आणि 17 मार्चला फेसबुकवर केंद्र सरकारने द कश्मीर फाईल्स करमुक्त करावा, अजित पवार (Ajit Pawar), अशा फेसबुकवरील बातमीच्या पोस्टवर यातील आरोपी यांनी, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, बारामती विधानसभा मतदार संघाचे आमदार अजित पवार यांना अब्रुनुकसान कारक आहेत.

हे माहित असताना वर नमुद सर्व फेसबुक (Facebook) अकाउंट धारक व्यक्तींनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बाबत अश्लील आक्षेपार्ह बदनामीकारक शिवीगाळ करणाऱ्या कमेंट फेसबुक या सार्वजनिक समाज माध्यमावर पोस्ट केल्या आहेत. म्हणून वरील सर्व फेसबुक अकाउंट धारक इसमांविरुध्द माझी तक्रार आहे. वगैरे मजकुराची तक्रार करंजेपुल दुरक्षेत्रावरुन आलेने गुन्हा रजी दाखल करुन दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोसई योगेश शेलार हे करीत आहेत.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, कारण अस्पष्ट

Phaltan Doctor Case: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात माजी खासदारासोबतच आमदाराचे नाव, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप; म्हणाले...

Airtel Cheapest Plan: एअरटेलचा बजेट-फ्रेंडली प्लॅन, वर्षभर सिम राहिल सक्रिय; किंमत किती?

Gold Rate Perdiction : पुढच्या वर्षी सोन्याचे दर नवा रेकॉर्ड बनवणार,किंमत ऐकून पायाखालची जमीन सरकेल, बाबा वेंगांची भविष्यवाणी

Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री थरार, जत्रेत जायंट व्हीलमध्ये १८ जण अडकले, ५ तास आकाशात मृत्यूशी झुंज| VIDEO

SCROLL FOR NEXT