Deepali Sayyed On Amit Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

Deepali Sayyed On Amit Thackeray: राज्यात जेवढे मनसे कार्यकर्ते, तेवढेच रस्त्यावर खड्डे; दीपाली सय्यद यांची आंदोलनावरून मनसेवर सडकून टीका

Deepali Sayyed: युवा नेत्यांना घराबाहेर काढुन कामाला लावा !", अशा शब्दांत दीपाली यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.

Ruchika Jadhav

Maharashtra Political News: मनसेकडून समृद्धी महामार्गावारील टोलनाक्यांवर झालेल्या तोडफोडीवरुन अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी निशाणा साधला आहे.' राज्यात जेवढे मनसे कार्यकर्ते, तेवढेच रस्त्यावर खड्डे', अशी खरमरीत टीका दिपाली सय्यद यांनी केली आहे. (Latest Marathi News)

आपल्या ट्वीटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. "मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाके व गाड्या फोडण्यापेक्षा खड्डे बुजवण्याची मोहिम घ्यावी, असा सल्ला दीपाली सय्यद यांनी दिला आहे. राज्यभरात जेवढे मनसेचे कार्यकर्ते तेवढेच रस्त्यावर खड्डे ! दोन दिवसाचे काम, उगाच जेलमध्ये महिना भर राहून देशाचे नुकसान आणि बाहेर स्टंटबाजी करून पन! युवा नेत्यांना घराबाहेर काढुन कामाला लावा !", अशा शब्दांत दीपाली यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.

अमित ठाकरे काही दिवसांपूर्वी उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी समृद्धी महामार्गावरून मध्यरात्री मुंबईच्या दिशेने जाताना टोलनाक्यावर त्यांचे वाहन आडवण्यात आले होते. काही मिनिटं त्यांना उभं रहावं लागलं. त्यानंतर अमित ठाकरेंच्या वाहनांचा ताफा पुढे सोडण्यात आला. ते तेथून गेल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि टोलनाक्याची तोडफोड केली.

टोलनाक्याच्या तोडफोडीनंतर अमित ठाकरेंवर भाजपने देखील निशाणा साधला होता. नेहमीच रस्ते आणि टोलनाके फोडण्यापेक्षा कधीतरी ते बांधायलाही शिका अशी टीका भाजपकडून करण्यात आली होती. अमित ठाकरेंवरील या टीकेला राज ठाकरेंनी दमदार प्रत्युत्तर दिलं होतं. तुम्ही फक्त दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यापेक्षा कधीतरी आपलेही पक्ष बांधायला शिका, असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. यानतंर आता दीपाली सय्यद यांच्या टीकेला काय प्रत्युत्तर मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

परिणिती चोप्राचा नवरा राघव चढ्ढा भाजपमध्ये प्रवेश करणार? माजी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Maharashtra Live News Update : जळगावात एटीएम मशीन चोरीला; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Skin Care Summer: उन्हाच्या कडाक्यात चेहऱ्याला लावू नका या गोष्टी, डॉक्टरांनी दिल्या टिप्स

Kalyan : कल्याणमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, डॉक्टरचा जागीच मृत्यू

Maharashtra Politics: राहुरीत राजकीय घडामोडींना वेग, भाजप उमेदवाराच्या विरोधात माजी मंत्री रिंगणात

SCROLL FOR NEXT