'...अन्यथा नारायण राणेंच्या मुलांचा राजकीय अंत होईल'; शिवसेना नेत्यांच वक्तव्य SaamTV
महाराष्ट्र

'...अन्यथा नारायण राणेंच्या मुलांचा राजकीय अंत होईल'; शिवसेना नेत्यांच वक्तव्य

'नारायण राणे (Narayan Rane) यांचा तोल गेलेला आहे. आपण किती शूर आहोत हे राणे दाखवत असले तरी ते पोलिसांना घाबरतात.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिंधुदुर्ग : नारायण राणे (Narayan Rane) यांच्या मुलांनी वेळीच सुधारावं आणि जर ते वेळीच सुधारले नाहीत तर, जसा नारायण राणेंचा जसा राजकिय अंत झाला तसाच त्यांच्या मुलांच्या राजकीय कारकिर्दीचा अंत होईल असं वक्तव्य शिवसेना (Shivsena) नेते तेथा माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे.

नारायण राणे (Narayan Rane) यांचा तोल गेलेला आहे. आपण किती शूर आहोत हे राणे दाखवत असले तरी ते पोलिसांना घाबरतात. दीपक केसरकर कोण ? विचारणारे नारायण राणे यांनी आपल्या मुलाच्या खासदारकीचा झालेला पराभव आठवावा. म्हणजे दीपक केसरकर (Deepak Kesarkar) कोण हे तुमच्या लक्षात येईल. असा टोलाही त्यांनी राणेंच्या वक्तव्यावरती लगावला आहे.

हे देखील पहा -

तसंच विरोधीपक्ष नेत्यांनी विधानसभेत नितेश राणेंना (Nitesh Rane) झापलं. असा पोरकट पणा करू नका, तुम्ही तुमच्या मुलांवर नियंत्रण आणू शकला नाही. शिवाय तुम्ही 25 वर्षात मुख्यमंत्री असून सुद्धा जिल्ह्यात निधी आणू शकला नाही. तेवढा निधी मी पाच वर्षांत आणला असल्याचा टोलाही दिपक केसरकर यांनी नारायण राणे यांना लगावला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT