महाराष्ट्र

खरातसोबतच्या व्हायरल फोटोंवर दीपक केसरकरांचं स्पष्टीकरण; भेटीमागचं कारण सांगितलं

Deepak kesarkar on Ashok Kharat : अशोक खरातच्या फोटोंवर दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच त्यांनी खरातच्या भेटीमागचं कारण देखील सांगितले.

Saam Tv

अशोक खरात प्रकरणावरून महाराष्ट्रात नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय

संजय राऊत यांनी दीपक केसरकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत

केसरकर यांनी राऊतांचे सर्व आरोप फेटाळले

विनायक वंजारे, साम टीव्ही

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. या अशोक खरातचे इतर राजकीय नेत्यांसोबतचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हायरल फोटोंवरून संजय राऊत यांनी शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांना लक्ष्य केलं. संजय राऊत यांनी अशोक खरातच्या इशाऱ्यावर सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असल्याचाही आरोप केला. संजय राऊतांच्या आरोपांना माजी मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं. त्यांनी राऊतांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

अशोक खरात प्रकरणावर दीपक केसरकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी खरातशी वैयक्तिक ओळख असल्याचे आरोप फेटाळून लावले. दीपक केसरकर म्हणाले, '​कॅप्टन खरात याला गंभीर आरोपाखाली अटक झाली आहे. त्याच्या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन न्यायालय योग्य तो निर्णय घेईलच'.

'कॅप्टन खरात याच्याशी माझी ओळख केवळ राजकीय किंवा वैयक्तिक कारणातून नाही. तर सिन्नर येथील ईशानेश्वर मंदिराच्या कामामुळे झाली. या मंदिराच्या रस्त्यासाठी त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे भेट झाली होती. त्याचा ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे खगोलशास्त्र/ज्योतिषशास्त्रामध्ये चांगला अभ्यास आहे. त्यामुळे माझ्यासारख्या अनेक लोकांची त्याच्याशी केवळ त्या विषयापुरती ओळख आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

सोशल मीडियावरील ​व्हायरल फोटोंवर स्पष्टीकरण देताना दीपक केसरकर म्हणाले, 'सोशल मीडियावर फिरत असलेले फोटो ईशानेश्वर मंदिराच्या कामाच्या संदर्भातील किंवा त्यांच्या मुलीच्या लग्नातील आहेत. एखाद्या ओळखीच्या व्यक्तीच्या निमंत्रणावरून लग्नाला जाणे किंवा शुभेच्छा देणे हा सामाजिक शिष्टाचार आहे. त्याचा वैयक्तिक प्रकरणांशी संबंध जोडू नये'.

संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना केसरकर म्हणाले, 'संजय राऊत यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. कॅप्टन खरात कधीही माझ्या कार्यालयात आला नाही. तो माझं विभाग चालवत होता, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचं आहे. माझ्या कार्यकाळात शिक्षण आणि मराठी भाषा विभागात जे ऐतिहासिक निर्णय झालं. ते क्वचितच इतर कोणत्याही मंत्र्यांच्या काळात झालं असतील. त्यामुळे विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे चुकीचे आहे. केवळ फोटोंच्या आधारे कोणत्याही राजकीय व्यक्तीचा या प्रकरणाशी संबंध जोडून चुकीची प्रसिद्धी देऊ नये ही विनंती'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Elephanta Caves : 'घारापुरी' लेणीला 'एलिफंटा' हे नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

उंची कमी असल्यास कपड्यांची निवड कशी करावी? जाणून घ्या 5 स्मार्ट स्टायलिंग टिप्स

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मूळ वेतनात होणार ५१००० रुपयांची वाढ? कसं असेल कॅलक्युलेशन?

SCROLL FOR NEXT