दिलासादायक! राज्यात कोरोना रुग्ण संख्येत घट; मृत्यूदरही घटला . Saam TV
महाराष्ट्र

दिलासादायक! राज्यात कोरोना रुग्ण संख्येत घट; मृत्यूदरही घटला

आजपर्यंत राज्यात एकूण 69,53,514 कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.98 टक्के आहे.

वृत्तसंस्था

मुंबई - राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच कोरोनच्या नव्या ओमिक्रॉन (Omicron) या व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 33 हजार 470 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 29,671 कोरोनमुक्त झाले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 69,53,514 कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.98 टक्के आहे.

गेल्या 24 तासात 8 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.04 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 2,06,046 रुग्ण अॅक्टीव आहेत. आतापर्यंत 1,41,647 रुग्णांना कोरोनामुळे आपला जिव गमवावा लागला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांनी कोरोनाची तिसरी लाट जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कमी होईल असे संकेत देखील दिले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांची तोफ धडाडली, महाराष्ट्र पिंजून काढला

Raigad Politics: राष्ट्रवादी-शिवसेना संघर्ष टोकाला; मंत्री भरत गोगावले यांच्या मुलावर गुन्हा दाखल

IND vs SA ODI: डोंगराएवढी धावसंख्या करूनही टीम इंडियाचा दारूण पराभव; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत १-१ ने बरोबरी

आजारपणामुळे ब्रेक घेतलेल्या संजय राऊतांची भेट! कोणकोणत्या राजकीय नेत्यांकडून विचारपूस?

Maharashtra Politics: कोकणात ठाकरेंची स्पेस 'झिरो'? राणे बंधूंचीच चर्चा, ठाकरे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT