Ntin Gadakari Latest News Saam Tv
महाराष्ट्र

Nitin Gadakari : मोठी बातमी! नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी, दाऊदच्या आवाजात ३ वेळा कॉल

Nitin Gadakari Threatened Call : नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात हे कॉल आले आहेत. नितीन गडकरींच्या सुरक्षेत मोठी वाढ केली आहे.

Gangappa Pujari

Nagpur: राज्याच्या राजकारणातून सध्या एक मोठी बातमी येत असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात हे कॉल आले आहेत. या बातमीनंतर मोठी खळबळ माजली असून पोलिसांनी तात्काळ मंत्री नितीन गडकरी यांच्या सुरक्षेत मोठी वाढ केली आहे. (Nitin Gadkari)

याबाबत अधिक माहिती अशी की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात तब्बल तीन वेळा धमकीचे कॉल आल्याची बातमी समोर आली आहे. सकाळी ११, साडेअकरा आणि पुन्हा बारा वाजता हे कॉल आले. कॉलमध्ये दाऊदच्या आवाजात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.

या धक्कादायक बातमीनंतर नितीन गडकरी यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्या नागपूरमधील निवासस्थानीही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात नेहमीच कार्यकर्त्यांची वर्दळ पाहायला मिळत असते. त्यामुळे या धमकीनंतर पोलिसांनी सतर्क राहत सुरक्षा वाढवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : मायदेशात ऑस्ट्रेलिया २३६ धावांवर ढेपाळला, हर्षित राणाचा ४ विकेट चौकार

Maharashtra Live News Update: रवींद्र धंगेकर यांच्यावर भाजपचे कार्यकर्ते प्रचंड नाराज, पक्षश्रेष्ठी यांच्याकडे तक्रार

Janhvi Kapoor Boyfriend: जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड कोण आहे? ज्याच्याशी लग्नाची सुरू झालीये चर्चा

Central Government: मोदी सरकारचं कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, ती एक मागणी मान्य, UPS, NPS मध्ये केले बदल

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, PSI बदने अन् बनकरबाबत धक्कादायक माहिती

SCROLL FOR NEXT