सांगलीमध्ये विहिरी शेजारी खेळताना बालकाचा दुर्दैवी मृत्यू! विजय पाटील
महाराष्ट्र

सांगलीमध्ये विहिरी शेजारी खेळताना बालकाचा दुर्दैवी मृत्यू!

विहिरीच्या काठाला बसून काठीला दोरी बांधून मासे पकडण्याचा ही चार बालके खेळ खेळत होती.

विजय पाटील, साम टीव्ही, सांगली

सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरज (Miraj) तालुक्यातील टाकळी (Takali) यवथील आंबेडकर नगर (AmbedkarNagar) मधील आरुण शंकर दोडमनी ह्या चार वर्षांच्या बालकांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. अरुण हा आपला मोठा भाऊ व आणखी दोन  मित्रांच्या सोबत मासे पकडण्यासाठी घरापासून काही अंतरावर असलेल्या सुरगोंडा पाटील यांच्या शेतातील विहिरी जवळ गेला होता पावसाने या  विहिराला पाणी भरपूर आले आहे.(Death of a child in Sangli)

हे देखील पहा-

विहिरीच्या काठाला बसून काठीला दोरी बांधून मासे पकडण्याचा ही चार बालके खेळ खेळत होती यावेळी विहिरीत तोल जाऊन अरुण पडला यावेळी सोबत असलेला मोठा भाऊ व दोन मित्र घाबरून घरी पळून गेले घरात गेल्यानंतर त्यांनी अरुण विहिरीत पडल्याची माहिती दिली.

मात्र तो पर्यंत खूप वेळ झाला होता यावेळी विहिरीत उतरून स्थानिक नागरिकांनी अरुणचा मृतदेह बाहेर काढला. ग्रामीण पोलिसांनी (Rural police) घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनला पाठवला आहे.या घटने मुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT